देहूरोडमध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूरोडमध्ये गणरायाचे
उत्साहात स्वागत
देहूरोडमध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत

देहूरोडमध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत

sakal_logo
By

देहूरोड, ता. ३१ ः गणपती बाप्पा मोरयाच्या नामघोषात विघ्नहर्त्या गणरायाचे देहू आणि देहूरोड परिसरात गणेश भक्तांनी उत्साहात स्वागत केले. परिसरातील गावातील मानाचे गणेशोत्सव मंडळे यांनी सायंकाळी उशिरापर्यंत आणि घरगुती गणपतीचे दुपारी एकच्या सुमारास गणेशभक्तांनी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
देहूरोड बाजारपेठेतील ऐतिहासिक सुभाष चौकातील शिवस्मारक समितीच्या मंदिरात तुकाराम दाभोळे यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली. अॅड. कृष्णा दाभोळे, ईश्वर गलांडे व इतर उपस्थित होते. अखिल महात्मा फुले भाजी मंडईतील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने यांच्या हस्ते झाली. बाळासाहेब शेलार, धनराज शिंदे, रशीद शेख, उमेश जैन, गुरुमितसिंग रत्तू, महेंद्र सरोदे व इतर उपस्थित होते. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने यांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. राजन सावंत, अनिल बोगावडे, नरेंद्र महाजनी, किरण गोटे, माणिक भोंग, अजय राय, विक्रम जाधव व इतर उपस्थित होते. वैश्य समाज मंदिरातील सुदर्शन मंडळामध्ये राहुल गोयल यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. विशाल खंडेलवाल, अमित शर्मा, आयुष मित्तल, ऋतिक आगरवाल व इतर उपस्थित होते.
लष्कराच्या विविध डेपोमध्ये कामगारांच्यावतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. डीओडी डेपोमध्ये कर्नल नितीन नहरिया, अंबिका नहरिया यांच्या हस्ते गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. यावेळी कामगार नेते पंडित बालघरे, अजित शेलार, दीपक दाभाडे, बाबासाहेब कातोरे, अनिल लांडे, गोरक्षनाथ मगर, तन्वी नहरिया व लष्कराचे अधिकारी उपस्थित होते.
देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यासमोरील मानाचा नवशा गणपती मंडळ, बाजारआळीतील शिरीषकुमार मित्र मंडळ, शिवाजी चौकातील हनुमान मंडळाने ढोलताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत केले. झेंडेमळा येथील सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठेत व्यापाऱ्यांची धांदल उडाली. अनेक गणेश मंडळांनी देखावे पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लगबग सुरु होती.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95656 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..