श्री सयाजीनाथ विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री सयाजीनाथ विद्यालयात 
राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
श्री सयाजीनाथ विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

श्री सयाजीनाथ विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा खो-खो असोसिएशनचे सहसचिव अविनाश करवंदे, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा यांनी भेट दिली.
जाधव यांच्या हस्ते खो-खो मैदानाची पूजा करण्यात आली. त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना प्राचार्य राजकुमार गायकवाड, खो-खो मार्गदर्शक करवंदे, विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जैनक, वारखडे, सोनवणे व मुख्याध्यापक खांदवे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तत्पूर्वी श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय व राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व पाहुण्यांच्या हस्ते खो-खो प्रशिक्षकांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. खो-खो प्रशिक्षक अमोल घरत, मंगेश घनोकर, गणेश मातेरे, पूजा जोशी यांनी नियोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95668 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..