सध्याच्या काळात विश्वासार्हतेला महत्व डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत, ‘उद्धवश्री’ पुरस्कारांचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सध्याच्या काळात विश्वासार्हतेला महत्व 
डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत, ‘उद्धवश्री’ पुरस्कारांचे वितरण
सध्याच्या काळात विश्वासार्हतेला महत्व डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत, ‘उद्धवश्री’ पुरस्कारांचे वितरण

सध्याच्या काळात विश्वासार्हतेला महत्व डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत, ‘उद्धवश्री’ पुरस्कारांचे वितरण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० : कोणताही पुरस्कार हा एका व्यक्तीचा नसतो. तर, त्या व्यक्तींच्या पाठीशी असणाऱ्या अनेक अदृश्य श्रमांचा असतो. त्यामुळे ज्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे; त्यांचा हा पुरस्कार आहे आणि तुम्ही कोणाचा विश्वासघात केला नाही, म्हणून हा पुरस्कार तुमचा आहे. आजच्या काळात विश्वासार्हता हा एक आव्हानात्मक विषय झाला आहे. त्यामुळे विश्वासार्हतेला महत्त्व आले आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी (ता. ३०) चिंचवड येथे व्यक्त केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, उद्धवश्री पुरस्कार समिती पुणे, पिंपरी चिंचवड शहरतर्फे ‘उद्धवश्री’ पुरस्कारांचे वितरण प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले. यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. पुरस्कार वितरण सोहळ्यास शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहीर, अ‍ॅड. वैभव थोरात, राज्य संघटक गोविंद घोळवे, शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, समितीचे अध्यक्ष, माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
पद्मश्री मुरलीकांत पेटकर (क्रीडा), श्रीकांत बडवे (उद्योजक), डॉ. स्मिता जाधव (शैक्षणिक), अक्षय बाहेती (सनदी लेखापाल), महेंद्र थोपटे (शिल्पकार), मुबारक खान (वैद्यकीय), श्रीमती प्रभा शिवणेकर (राष्ट्रपती पुरस्कार विजेती), विजय यादव (छत्रपती पुरस्कार विजेता), रामदास कुदळे (क्रीडा), धनंजय डोंजेकर (अभिनेता), रमेश पाचंगे (चौघडावादक), संतोष साळुंखे (शिवशाहीर), मिलिंद कांबळे (पत्रकारिता), मेहबूब शेख (सामाजिक), बाबू नऱ्हे (सामाजिक), आकांक्षा पिंगळे (बालकलाकार), संगीता तरडे (सामाजिक) आदी विविध क्षेत्रातील गुणवंतांना ‘उद्धवश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दिवंगत बाबासाहेब धुमाळ यांच्या नावाने गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटपही करण्यात आले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘पुरस्कार मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीचा संघर्ष वेगवेगळा आहे. आपल्याला मिळणारा पुरस्कार हा आपल्या कामाचे योगदान आणि कामाची पावती असते.’’
सचिन अहीर म्हणाले की, हा पुरस्कार खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखाबद्दल आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निष्ठा, प्रेम आणि स्नेह दाखवणारा आहे.

महापालिका निवडणुकीत विजय
आगामी काही दिवसात जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका आहेत. आपण एकत्रितपणे आणि एकजुटीने या निवडणुका लढवू आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर विजय प्राप्त करून खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांना विजयाचा उद्धवश्री देऊ, असे मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
फोटो ः 88146

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95676 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..