घरोघरी गणपती विराजमान शहरात आनंदी, उत्साही व चैतन्यमय वातावरण; सार्वजनिक मंडळांसह घरोघरी स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरोघरी गणपती विराजमान
शहरात आनंदी, उत्साही व चैतन्यमय वातावरण; सार्वजनिक मंडळांसह घरोघरी स्वागत
घरोघरी गणपती विराजमान शहरात आनंदी, उत्साही व चैतन्यमय वातावरण; सार्वजनिक मंडळांसह घरोघरी स्वागत

घरोघरी गणपती विराजमान शहरात आनंदी, उत्साही व चैतन्यमय वातावरण; सार्वजनिक मंडळांसह घरोघरी स्वागत

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ ः दोन वर्षांच्या खंडांनंतर पुन्हा ढोल वाजले. ताशे वाजले. वाजत गाजत गणपती घरोघरी विराजमान झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना केली. विविध देखावे केले. दिवसभर शहरातील वातावरण गणपतीच्या जयघोषाने दुमदुमून गेले. त्यामध्ये आनंद होता. उल्हास होता. चैतन्य होते. श्रद्धा होती. भक्ती होती. आराधना होती. लाडक्या गणरायाला केलेली प्रार्थना होती. भक्ताच्या हाकेला धावून येणारी ‘शक्ती’ होती.
गणेशोत्सव सर्वांचा आवडता सण. आवडता उत्सव आणि त्यात असलेला सर्वांचाच उत्साह. मात्र, गेले दोन वर्षे कोरोनामुळे त्यावर निर्बंध होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. बुधवारी (ता. ३१) घरोघरी गणपतीचे आगमन झाले. सार्वजनिक गणेश मंडळांनीही वेगवेगळे देखावे सादर केले आहेत. काही मंडळांनी ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे स्वागत केले. मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली. घरोघरीही गणपतीचेच वातावरण होते. काहींनी मंगळवारीच गणेश मूर्ती घरी आणल्या होत्या. बुधवारी सकाळपासूनच प्रत्येक गल्लीतील वातावरण भक्तीमय झाले होते. कोणी गणेश मूर्ती आणायला जात होते. तर, कोणी गणरायाला घेऊन घराकडे येत होते. डोक्यावर टोपी घालून हाताने टाळी, घंटी, टाळ वाजवत आणि मुखाने ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करीत होते. पूजा साहित्याच्या दुकानांतही खरेदीसाठी गर्दी होती. बाजारपेठांमध्ये रस्त्याच्या कडेला पूजा साहित्य व गणपती पूजनासाठी आवश्यक असलेली फुले व वेगवेगळ्या वनस्पतींच्या पत्री घेऊन विक्रीसाठी बसलेले होते. गणरायाची मूर्ती घरी नेण्यासाठी पारंपरिक वेशभूषेत आलेले आबालवृद्ध लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे ठिकठिकाणच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या. ढोल-ताशा पथकांमध्ये दोन वर्षांची कसर भरून काढण्यासाठी अभूतपूर्व उत्साह होता. दरम्यान, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या श्री दशभुजा लक्ष्मी गणपतीची प्रतिष्ठापना चिंचवडगावातील गांधीपेठेत हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव उत्तम दंडिमे यांच्या हस्ते झाली. विधिवत पूजन करण्यात आले. अथर्वशीर्ष पठण आणि पूजा करण्यात आली.

पावसाची दमदार हजेरी
बुधवारी सकाळपासूनच गणेशोत्सवाची लगबग शहरात होती. पण, कधी कडक ऊन पडायचे. मध्येच ढग आले की सावली पडायचे. मात्र, उकाडा खूप होता. अखेर दुपारी तीनच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांची व सकाळी रेनकोट किंवा छत्री घेऊन घराबाहेर पडलेल्यांची गैरसोय झाली. मात्र, अनेकांनी पावसातच गणरायाचे स्वागत केले. पावसात भिजतच अधिक उत्साहाने आनंदाने गणेश मूर्तींना घरी नेऊन प्रतिष्ठापना केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95689 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..