भोसरीत ‘एसआरए’ला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत ‘एसआरए’ला विरोध
भोसरीत ‘एसआरए’ला विरोध

भोसरीत ‘एसआरए’ला विरोध

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः भोसरी-खंडेवस्ती झोपडपट्टी पुनर्वसनासाठीच्या सर्वेक्षणादरम्यान घरावर क्रमांक टाकण्यास विरोध करण्यात आला आहे. निंबाळकर यांच्या या असंवेदनशीतेबाबत झोपडीधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. निंबाळकर उत्तर देताना या व्हिडीओत दिसत आहेत.
भोसरी, खंडेवस्ती येथील झोपडपट्टीच्या पुनर्वसनाला तेथे राहणाऱ्या झोपडीधारकांना तीव्र विरोध आहे. त्याकडे दुर्लक्ष करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत (एसआरए) खंडेवस्ती झोपडपट्टीत सर्वेक्षण केले जात आहे. पुनर्वसनासाठी तेथे राहणाऱ्या ७५ टक्के नागरिकांनी संमती दर्शवल्याचे एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांचे म्हणणे आहे. पण फोटो पास द्यायचे असल्याचे सांगून संमतीपत्रावर आमच्या सह्या घेण्यात आल्याचे तेथील झोपडीधारकांचे म्हणणे आहे. पण झोपडीधारकांच्या म्हणण्याला काडीचाही किंमत न देता एसआरएमार्फत तेथे सर्वेक्षण केले जात आहे.
या सर्वेक्षणासाठी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर हे मंगळवारी (ता.३०) स्वतः खंडेवस्ती झोपडपट्टी येथे उपस्थित होते. पोलिस बंदोबस्तात सुरू असलेल्या या सर्वेक्षणादरम्यान एका महिलेने तिच्या घरावर नंबर टाकण्यास विरोध केला. त्या महिलेला राजेंद्र निंबाळकर यांनी ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. महिला पोलिस त्या महिलेला ताब्यात घेण्यासाठी तिच्या घरात घुसू लागले. त्याचवेळी त्या महिलेने माझ्या घरावर नंबर टाकल्यास मी काही तरी करून घेणार, असा इशारा दिला. वरिष्ठ अधिकारी असलेले राजेंद्र निंबाळकर यांनी हे प्रकरण संयमाने हाताळण्याची आवश्यकता होती. त्यांनी तसे न करता ‘काय करायचे ते करा, काही प्रॉब्लेम नाही मला’, असे म्हणत असंवेदनशीलपणा दाखवला.
या सर्व प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी त्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांसोबत अधिकारी कशा पद्धतीने वागतात, हे स्पष्ट होते. राजेंद्र निंबाळकर यांच्या या असंवेदनशीपणाबाबत खंडेवस्ती झोपडपट्टीतील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्या महिलेने स्वतःच्या जिवाला खरोखरच काही तरी बरे वाईट करून घेतले असते, तर राजेंद्र निंबाळकर यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली असती का, असा सवाल नागरिक करत आहेत.


‘‘झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खंडेवस्तीतील ७५ टक्के झोपडीधारकांनी संमती दिली आहे. पुनर्वसनाला तेथील लोकांचा विरोध असेल, तर त्यांनी आमच्या वरिष्ठांकडे तसे लेखी म्हणणे मांडावे. लोकांनी स्वतःच्या तोंडाची वाफ घालवून उपयोग नाही. लोकांनी कायदा समजून घ्यावा. त्यांचा पुनर्वसनाला एवढाच विरोध असेल आणि खोटे सांगून संमतीपत्रावर त्यांच्या सह्या घेतल्या असतील तर त्यांनी न्यायालयात जावे.’’
- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95736 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..