शहरावर पकड ठेवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी खासदार बारणे प्रयत्नशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरावर पकड ठेवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न
विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी खासदार बारणे प्रयत्नशील
शहरावर पकड ठेवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी खासदार बारणे प्रयत्नशील

शहरावर पकड ठेवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी खासदार बारणे प्रयत्नशील

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट व भाजपची सत्ता राज्यात स्थापन झाली. त्यापाठोपाठ १२ खासदारांनीही लोकसभेत गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करून शिवसेनेला शह दिला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न शिंदे गटातून होत आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आयुक्त पदावरून सुहास दिवसे यांची बदली करून राहुल महिवाल यांची नियुक्ती करताना खासदार बारणे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेतून आयुक्त पदावरून राजेश पाटील यांना हटविण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांची जशी महत्त्वाची भूमिका होती तशीच त्या पदावर शेखर सिंह यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच खासदार बारणे यांचीही महत्त्वाची भूमिका होती.
महापालिकेच्या निवडणुकांसाठी तीन सदस्यीय प्रभागांची रचना करताना थेरगाव परिसराची तोडफोड करताना तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी खासदार बारणे यांच्या तक्रारी व सूचनांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पाटील यांना पुन्हा त्याच जागेवर ठेवण्यासाठी अथवा त्यांना पुणे शहर परिसरात चांगल्या जागेवर नियुक्ती करण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके व शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्यामार्फत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ताकद लावली होती. मात्र, फडणवीस यांनी मुख्यमंत्री व खासदार बारणे यांनी तो निर्णय घेतला आहे. आपणाला एकत्र काम करायचे आहे, असे सांगून सिंह यांच्या नियुक्तीत बदल होणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.
शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत पिंपरीतील बौद्धनगर येथील पत्रा शेडच्या झोपडपट्टी पुनर्वसनाचे कामही मार्गी लागल्यानंतर गेल्या सोमवारी (ता. २९) खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ११२ घरांच्या लाभधारकांना घरांचे वाटप करण्यात आले. हे एक छोटेसे उदाहरण असून, अशीच विकासाची कामे मार्गी लावून शिंदे गट शहरात पाय रोवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. बारणे यांच्या माध्यमातून शिंदे गट वडगांव मावळ, पिंपरी-चिंचवडबरोबरच घाटाखाली म्हणजेच रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत व पनवेल या ठिकाणीही पाय रोवण्याचा प्रयत्न करणार आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात १९८४ पूर्वीच्या जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा लवकरात लवकर मिळावा. पुणे ते लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. परंतु; राज्य सरकारचा हिस्सा मिळण्यासाठी राज्य सरकारच्या सहमतीची आवश्‍यकता आहे. या व अशाच शहराच्या विकासासाठीच्या प्रलंबित कामांवर, प्रश्‍नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा मतदारसंघ.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96005 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..