अडीच लाखाहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अडीच लाखाहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना
अडीच लाखाहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना

अडीच लाखाहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना

sakal_logo
By

शहर परिसरात १,७४२ मंडळे
गणरायाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी घरोघरी सुंदर रांगोळी, धूप, अगरबत्ती, फुलांचा सुगंध आणि गणपतीची गाणी कानावर पडली. सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्याकर्त्यांतही उत्साह आहे. वातावरण प्रसन्न आहे. काही मंडळांनी सायंकाळी देखावे खुले केले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरासह देहूरोड, तळेगाव, इंदोरी, शिरगाव, आंबी, म्हाळुंगे, खालुंब्रे, चाकण, आंबेठाण, दिघी, आळंदी, हिंजवडी, माण परिसरात सुमारे अडीच लाखांहून अधिक गणपतींची प्रतिष्ठापना झाली आहे. वाकड, हिंजवडी, चाकण पोलिसं ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक गणपतींची प्रतिष्ठापना झाली आहे. घराघरांत उत्साह दिसून आला. सायंकाळी आरतीसाठी लगबग होती. बहुतांश घरगुती गणेश मूर्तींचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एक हजार ७४२ सार्वजनिक मंडळांनी प्रतिष्ठापना केली आहे.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96079 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..