देखाव्यांसोबतच शहर परिसरात सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे खुली वरुणराजाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देखाव्यांसोबतच  
शहर परिसरात सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे खुली
वरुणराजाची हजेरी
देखाव्यांसोबतच शहर परिसरात सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे खुली वरुणराजाची हजेरी

देखाव्यांसोबतच शहर परिसरात सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे खुली वरुणराजाची हजेरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः मोठ्या उत्साहात घरोघरी गणपती विराजमान झाले. सार्वजनिक मंडळांनीही मिरवणुका काढून प्रतिष्ठापना केली. नवचैतन्य संचारले. आनंदोत्सवाला प्रारंभ झाला. तो द्विगुणित करणारे देखावे बहुतांश मंडळानी गुरुवारी सायंकाळी खुले केले. मात्र, त्याच वेळी वरुणराजाने साधारणतः पाऊणतास दमदार हजेरी लावली.
बुधवारी रात्री उशिरापर्यंत देखावे पूर्ण करण्याची मंडळांची लगबग सुरू होती. जवळपास सर्वच मंडळांनी विद्युत रोषणाई केली आहे. काही मंडळांनी जिवंत तर काही मंडळांनी हलते देखावे केले आहेत. बहुतांश हलत्या देखाव्यांची कामे अपूर्ण होती. ती पूर्ण करण्यासाठी गुरुवारी दिवसभर मंडळांचे कार्यकर्ते झटत होते. अखेर सायंकाळपर्यंत देखावे पूर्ण करून पाचनंतर ते खुलेही केले. मात्र, सहाच्या सुमारास तुरळक पावसाला सुरवात झाली. थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. वाकड, थेरगाव, काळेवाडी, सांगवी, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, चिंचवड, पिंपरी भागात रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. त्यामुळे रस्ते धुवून निघाले. साधारण अर्ध्या तासानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे सातनंतर पुन्हा देखावे पाहण्यासाठी नागरिक येऊ लागले. वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान, बुधवारी गणपतीच्या आगमनाच्या वेळीसुद्धा पावसाने दमदार हजेरी लावली होती. गणेशोत्सवात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आणखी चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96120 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..