सरोगसी कायद्याचा योग्य वापर व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरोगसी कायद्याचा योग्य वापर व्हावा
सरोगसी कायद्याचा योग्य वापर व्हावा

सरोगसी कायद्याचा योग्य वापर व्हावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः सुरक्षित मातृत्वासाठी सरोगसी कायद्याचे पालन व तंत्रज्ञान कायद्याचा योग्य व रास्त वापर व्हावा, अशी अपेक्षा फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडियाचे डॉ. कुंदन इंगळे यांनी व्यक्त केली. सरोगसी (‍नियमन) कायदा व सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (‍नियमन) कायद्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
केंद्र व राज्य सरकारने ‘सरोगसी (नियमन) कायदा’ व ‘सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) कायदा’ लागू केला आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ॲण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटीतर्फे महापालिका सेवेतील वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, खासगी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रधारक, सरोगसी सेवा देणारे केंद्रधारक, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अशा संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) चाणक्य सभागृहात कार्यशाळा झाली. त्यात फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडियाचे डॉ. कुंदन इंगळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. नीलेश बलकवडे, डॉ. ममता ‍दिघे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. दिलीप कामत, डॉ. संजय देवधर, डॉ. विजय सातव, इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनचे डॉ. माधव कुलकर्णी, डॉ. संदीप पानसरे, सल्लागार समिती सदस्या ॲड. मनीषा महाजन, डॉ. राजेंद्र करंबेळकर, डॉ. विभा झुत्सी, डॉ.मनीषा सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मुक्ती पानसे, डॉ. सुनीता साळवे, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. तृप्ती सागळे, डॉ. ऋतुजा लोखंडे आदी उपस्थित होते.

सरोगसी म्हणजे काय?
सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेचे गर्भाशय भाड्याने घेऊन तिच्या मदतीने अपत्य जन्माला घालणे. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही, त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मूल प्राप्त होऊ शकते. काही महिला किंवा पुरुष सक्षम नसल्याने किंवा याआधी ॲबॉर्शन झाल्यामुळे काही जोडपी मूल जन्माला घालू शकत नाहीत. अशावेळी कायद्याच्या चौकटीत राहून सरोगसी असतो.

सरोगसी कोण करू शकते?
मातृत्वासाठी इच्छुक महिलेला गर्भपिशवी नसल्यास, ती काढून टाकलेली असल्यास, गर्भपिशवी अकार्यक्षम असल्यास, कोणत्याही कारणास्तव एकाहून जास्त वेळा गर्भपात झाला असल्यास, ‘आयव्हीएफ’द्वारे वारंवार प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसल्यास, काही आजारामुळे महिला गर्भवती राहणे शक्य नसल्यास, ती गर्भवती राहणे तिच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्यास ‘सरोगसी’ करता येते.

कायदा काय सांगतो?
- सरोगसी व सहायक प्रजनन तंत्रज्ञाने कायद्यानुसार एका महिलेला जास्तीतजास्त तीन वेळा सरोगसी प्रक्रिया करता येईल
- एका वेळी केवळ एकाच गर्भाचे रोपण महिलेच्या गर्भपिशवीत करता येईल, पण, जबाबदारी सरोगेट मातेची नसेल
- सरोगसीची सेवा प्रदान करणाऱ्या रुग्णालयांना नोंदणी व त्यांत तज्ज्ञ डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची नियुक्ती बंधनकारक आहे
- सरोगेट माता आणि सरोगसी इच्छुकांमध्ये करार बंधनकारक, जन्मानंतर बाळाचे पालकत्व इच्छुक दाम्पत्याकडे
- सरोगसी इच्छुकांपैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यू झाल्यास, त्यांच्याशी संपर्क न झाल्यास मूल कोणाकडे द्यायचे, हे करारात आवश्यक
- सरोगसी इच्छुक दांपत्य व सरोगेट माता यांबाबत रुग्णालये व दवाखान्यांनी गुप्तता पाळावी
- डॉक्टराच्या सल्ल्यानुसार गर्भपाताचा अधिकार आहे, मात्र मूल होईपर्यंत मातेची काळजी घेण्याची जबाबदारी दाम्पत्याची
- एखाद्या स्थितीमध्ये ‘सरोगसी’ करू इच्छिणाऱ्यांनी जबाबदारी न स्वीकारल्यास बालकाला त्याच्या पालकांचा वारसा हक्क लागू असेल
- सरोगेट माता होण्यासाठी इच्छुक महिलेकडे सक्षम (फिट) असल्याचे व दाम्पत्याकडे मूल जन्माला घालण्यासाठी सक्षम
नसल्याचे प्रमाणपत्र गरजेचे

सरकारने केलेल्या कायद्याची माहिती शहरातील डॉक्टरांना होणे आवश्यक आहे. कोणाचीही फसवणूक यात होऊ नये. उदात्त भावनेतून ही प्रक्रिया करायची, हा या मागील हेतू आहे. कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया देशात सुरू आहे. देशात सुमारे दीड कोटी दांपत्य सरोगसीसाठी इच्छुक आहेत. सुमारे ४० हजार रुग्णालये व दवाखाने सरोगसीसाठी तयार आहेत.
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96202 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..