सव्वा सात लाखांचा ऐवज बावधनमधून लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सव्वा सात लाखांचा ऐवज 
बावधनमधून लंपास
सव्वा सात लाखांचा ऐवज बावधनमधून लंपास

सव्वा सात लाखांचा ऐवज बावधनमधून लंपास

sakal_logo
By

पिंपरी : उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने सात लाख ३४ हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार बावधन बुद्रुक येथील भूगाव रोड येथे घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अहमदनगर, श्रीरामपूर येथील एका २२ वर्षीय महिलेला अटक केली आहे. या महिलेने उघड्या दरवाजावाटे घरात शिरून सोने-चांदीचे दागिने, रोकड व एक मोबाईल असा एकूण सात लाख ३४ हजारांचा ऐवज लंपास केला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कमलेश जैसवार (वय २३, रा. सी.पी. तलाव, ठाणे) याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पीडित महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मैत्रिणीचा भाऊ असलेल्या या आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीवर अत्याचार केला. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा
हातवारे, इशारे करीत इंस्टाग्रामवर चॅटिंग करून विनयभंग केल्याप्रकरणी सोनू नावाच्या एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार किवळेतील विकासनगर येथे घडला. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची तेरा वर्षीय पुतणीचा आरोपीने पाठलाग केला. हातवारे, इशारे केले. मुलीच्या इच्छेविरुद्ध इंस्टाग्रामवर वारंवार चॅटिंग करून मेसेज करीत विनयभंग केला. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

रावेतमध्ये दीड लाखाचे दागिने चोरीला
पेस्ट कंट्रोलचे काम करण्यासाठी घरी आलेल्या व्यक्तीने कपाटाचे लॉकर चवीने उघडून तिजोरीतील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. हा प्रकार रावेत येथे घडला. व्यंकटेश आडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बसवराज साहेबण्णा कोरे (रा. डि. एन. व्ही. अर्सेलीया बिल्डिंग, चंद्रभागा कॉर्नर, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. रावेत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पैसे न देता व्यावसायिकाची फसवणूक
मक्याचा माल खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे न देता व्यावसायिकाची साडे चौदा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दिलीप दशरथ राजिवडे (रा. यमुनानगर,निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक घोष (रा. सतखेरा, बांगलादेश), रणजित सिंग ऊर्फ अखिलेश मौर्य (रा. पश्चिम बंगाल ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून मका माल खरेदीच्या बहाण्याने ऑनलाइन व्यवहार केला. त्यांच्याकडून चौदा लाख ५७ हजार रुपये किमतीचा मका घेतला. मात्र,त्याचे देता फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बनावट चावीने कपाट उघडून ऐवज लंपास
पिंपरी येथे बनावट चावीने कपाट उघडून पावणे तीन लाखांचा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. एक लाख ९६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ८० हजारांची रोकड असा एकूण दोन लाख ७६ हजारांचा ऐवज लंपास केला. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96239 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..