गणपती उत्सवामुळे फुलांनी खाल्ला भाव पिंपरी फूल बाजार, व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती उत्सवामुळे फुलांनी खाल्ला भाव 
पिंपरी फूल बाजार, व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
गणपती उत्सवामुळे फुलांनी खाल्ला भाव पिंपरी फूल बाजार, व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

गणपती उत्सवामुळे फुलांनी खाल्ला भाव पिंपरी फूल बाजार, व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : गणपती उत्सवामुळे गणेश मंडळे तसेच घरोघरी विविध आकर्षक व सुगंधी फुलांची मागणी वाढली आहे. मंडळाची आरास तसेच पूजेसाठी फुले लागत असल्याने झेंडूपासून गुलाबाला तिपटीने मागणी वाढली आहे. त्यामुळे, फुलांना ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात मागणी वाढली असून, बाजार बहरला आहे. परिणामी, पिंपरीतील फूल बाजारामधील विक्रेत्यांमध्ये समाधानकारक वातावरण असल्याचे दिसून आले आहे.

बाजारात काही अंशी कृत्रिम व रेडीमेड फुलांनी बाजारपेठ व्यापली आहे. मात्र, परंपरेनुसार आजही घरोघरी पूजेसाठी फुलांना मागणी आहे. दैनंदिन हार, तसेच फुलांची माळ व दुर्वा गणरायाला अर्पण केल्या जातात. त्यामुळे, ताज्या फुलांकडे भाविक सकाळीच धाव घेत आहेत. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत बाजाराला असाच बहर राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दोन वर्षांनी गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. तसेच, गणेशोत्सव कालावधीत फुलांचा भाव दुपटीने वाढला आहे. पिवळा गोंडा २० वरुन ४० रुपये तर कलकत्ता गोंडा ३० वरुन ६० रुपयांवर गेला असल्याचे फूल बाजाराचे अध्यक्ष राजकुमार मोरे यांनी सांगितले.
---
सध्याचे फूलबाजार भाव :
गोंडा पिवळा - ३० ते ते ४० किलो
गोंडा ऑरेंज - ३० ते ४० किलो
कलकत्ता - ६० ते ७० किलो
अस्टर - २५ ते ३० : ४ जुडी
अस्टर गुच्छ - १५० किलो
गुलछडी - ७०० ते ८०० नग
शेवंती - १०० नग
तुकडा गुलाब - ३०० नग
डच गुलाब - १०० ते १५०
जरबेरा - ७० ते ८० जुडी
कामिनी पत्ता - ५ जुडी
दुर्वा जुडी - १०

फोटो ः 88559

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96294 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..