पत्नी, सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नी, सासरच्या मंडळींच्या 
त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
पत्नी, सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

पत्नी, सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : खून करण्याचा प्रयत्न केल्याचा पतीवर खोटा गुन्हा पत्नीने दाखल केला. सासरी नांदायला येण्यास नकार देत घटस्फोट मागितला. तसेच केस मागे घेण्यासाठी पत्नीच्या भावासह तिच्या नातेवाइकांनी बारा लाख मागितले. घटस्फोट न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोशी येथे घडली.
विशाल अंकुश डोंगरे (वय ३३, रा. लक्ष्मीनगर, मोशी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल यांची पत्नी (वय २७), मेहुणा संदीप बाळू धेंडे (वय ३४), बाळू शंकर धेंडे (वय ६४), सासू (वय ५५, सर्व रा. राधानगरी सोसायटी , दिघीरोड , भोसरी) व एक महिला (वय ३१, रा. यशवंतनगर,पिंपरी ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल यांच्या पत्नीला तिच्या नातेवाइकांनी फसवून घरी नेवून नांदायला पाठवले नाही. पत्नीने विशाल यांच्यावर तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला. सासरी नांदायला येण्यास नकार देत घटस्फोट मागितला. तसेच त्यांच्यावर दिघी पोलिस ठाण्यात दाखल असलेली केस मागे घेण्यासाठी पत्नीचा भाऊ संदीप व इतर नातेवाइकांनी बारा लाख रुपये मागितले. तू मुलीला घटस्फोट दिला नाही तर, तुझे हातपाय तोडण्याची तसेच घरातील महिलांना मारून टाकण्याची धमकी देत विशाल यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. आरोपीच्या या त्रासाला कंटाळून विशाल यांनी घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96318 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..