तब्बल ६०० वेळा सिंहगडचा ट्रेक वाकडच्या प्रशांत विनोदे यांचा विक्रम, बारा वर्षांपासून उपक्रम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल ६०० वेळा सिंहगडचा ट्रेक 
वाकडच्या प्रशांत विनोदे यांचा विक्रम, बारा वर्षांपासून उपक्रम सुरू
तब्बल ६०० वेळा सिंहगडचा ट्रेक वाकडच्या प्रशांत विनोदे यांचा विक्रम, बारा वर्षांपासून उपक्रम सुरू

तब्बल ६०० वेळा सिंहगडचा ट्रेक वाकडच्या प्रशांत विनोदे यांचा विक्रम, बारा वर्षांपासून उपक्रम सुरू

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ ः लहानपणापासूनच गडकिल्ल्यांची आवड तसेच शारीरिक तंदुरुस्ती आणि जगण्याची योग्य दिशा मिळण्यासाठी वाकडच्या प्रशांत विनोदे यांनी मित्रांसमवेत सुरु केलेल्या सिंहगड ट्रेकचे १२ वर्षात ६०० ट्रेक पूर्ण केले आहेत. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी केलेल्या ६०० ट्रेकने अनेक तरुणांना मोठी ऊर्जा दिली आहे.
डोंगराळ रस्ता, वेडीवाकडी वाट, पाठीवर प्रवासाचा संसार आणि ट्रेक पूर्ण करण्याचे ध्येय मनाशी बाळगून ऊन, वारा, पावसाचा सामना करत तब्बल ६०० सिंहगड ट्रेक त्यांनी पूर्ण केले आहेत. ट्रेक करत असताना अनंत अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले. डोंगर भाग असल्याने अनेकवेळा साप सोबत असायचे, पावसाने रस्ता निसरडा असायचा, चालून- चालून पायाला गोळे यायचे, विश्रांतीसाठी थांबले तर प्रचंड अंग दुखायचे परंतु एक दोन वेळा ट्रेक केल्यानंतर मनाची आणि शरीराची देखील पूर्ण तयारी झाली. त्यात मित्र परिवार सोबत असल्याने ट्रेक कधी पूर्ण होत आहे, हे समजत नसायचे. सुरवातीला घरच्यांचा तसा विरोधाच असायचा. प्रवासादरम्यान कायम फोनवर विचारपूस होत असत. परंतु नंतर मात्र त्यांनीदेखील पाठिंबा दिला असल्याचे विनोदे यांनी सांगितले.


पुणे शहराच्या दक्षिणेच्या डोंगर रांगांतील चढ-उताराच्या अवघड, निसरड्या, काही ठिकाणी एकच व्यक्ती जाईल अशा चिंचोळ्या वाटा असलेल्या सिंहगडचा एक ट्रेक करताना अनेकांची दमछाक होते. मात्र, प्रशांत विनोदे यांनी एक नाही तर तब्बल ६०० ट्रेक पूर्ण केले. त्यांनी २०१० मध्ये सिंहगड ट्रेकिंगचा प्रवास सुरु केला. तसेच ट्रेकिंग बरोबरच मॅरेथॉन धावणे, नवीन नवीन ठिकाणी पर्यटन करण्याचा छंद जडला. त्यातूनच पुढे याच वर्षी एवरेस्ट बेस कॅम्प सारखा खडतर ट्रेक अर्धागिनीला घेऊन पूर्ण केला. जवळ जवळ ३७ मॅरेथॉन पूर्ण केल्या. त्यात ५३ किलोमीटरची एसआरटी मॅरेथॉन केली. ४२ किलोमीटर, २७ हाफ, २१ किलोमीटरच्या व इतर २ पूर्ण केल्या. भारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पॉंडेचेरी, केरळ, उत्तरांचल, जम्मू काश्मीर, गोवा, परदेश पर्यटन-स्वीत्झलँड, जर्मनी २ वेळा, ऑस्ट्रेलिया, हॉलंड २ वेळा, चेक रिपब्लिक, दुबई, थायलंड २ वेळा, मलेशिया, सिंगापूर, भूतान, नेपाळ असे देश विदेशातील पर्यटन व ट्रेकिंग असा प्रवास त्यांनी केला.
-------------------------------
जीवनात येऊन एकदा तरी ट्रेक करायलाच हवा. या माध्यमातून आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी फार मदत होते. सातत्याने निर्सगाच्या सानिध्यात राहिल्यामुळे शारीरिक किंवा मानसिक आजारांपासून सहज दूर राहणे शक्‍य होते. केवळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्यामुळेच मी कोरोनासारख्या महामारीवर अगदी सहजरीत्या मात करू शकलो.

प्रशांत विनोदे, ट्रेकर
फोटो ः ८८०७९

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96365 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..