घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ः सिंह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटांवर वैद्यकीय पथकांसह 
रुग्णवाहिका तैनात ः सिंह
घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ः सिंह

घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ः सिंह

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ ः शहरातील प्रमुख दहा गणेश विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ठेवली आहे. यांसह इतर घाटांवर जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकरवाडी जाधवघाट, काळेवाडीतील घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली इंद्रायणी घाट, थेरगाव पूल नदी घाट, सुभाषनगर पिंपरी घाट आणि सांगवी वेताळबाबा मंदिर घाट याठिकाणी वैद्यकीय साहित्य, औषधे आणि रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात ठेवले जाणार आहे. वैद्यकीय पथकात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका वाहनचालक, सफाई कामगारांचा समावेश आहे. चार ते नऊ सप्टेंबर कालावधीत घाटांवर वैद्यकीय पथक कार्यरत राहतील, अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली. घाटांवर विसर्जन हौद उभारले असून स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन सुरू आहे. २६ घाटांवर लाईफ जॉकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96422 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..