अनधिकृत बांधकामाविरोधात ज्येष्ठ नागरिकांचे हेलपाटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामाविरोधात
ज्येष्ठ नागरिकांचे हेलपाटे
अनधिकृत बांधकामाविरोधात ज्येष्ठ नागरिकांचे हेलपाटे

अनधिकृत बांधकामाविरोधात ज्येष्ठ नागरिकांचे हेलपाटे

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : दळवीनगर-समर्थ कॉलनी येथील सामूहिक जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत महापालिकेच्या आयुक्त व शहर अभियंता अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी लेखी तक्रारी करण्यात आल्या. परंतु महापालिकेकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत पाठपुराव्यासाठी हेलपाटे घालून ज्येष्ठ नागरिक वैतागले आहेत.
समर्थ कॉलनीत सर्व्हे क्रमांक ३५३४ मध्ये ४९९८ चौरस फुटाचा भूखंड प्रकाश झोरे, बाबासाहेब भुजबळ, ज्ञानेश्‍वर किरवे व लक्ष्मण शिंदे यांनी ३ फेब्रुवारी १९८५ रोजी खरेदी केला. १० फेब्रुवारी १९८७ रोजी बांधकाम परवाना घेतला. ४ ऑगस्ट १९८९ रोजी महापालिेकचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला.
आम्ही कलेल्या अर्जाचा विचार का केला जात नाही, याचा खुलासा त्वरित करावा व अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन काढून टाकावे, असे त्यांनी या तक्रार अर्जात म्हटले आहे. यासाठी हे ज्येष्ठ नागरिक आठ महिन्यांपासून हेलपाटे घालत आहेत. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता आबा ढवळे व कनिष्ठ अभियंता धुमाळ यांना भेटून त्यांनी या तक्रारी दिल्या आहेत.

कार्यालयातील जनसंवाद सभेत त्यांचे गाऱ्हाणे ऐकून निकम यांनी धुमाळ यांना संबंधीत अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश मोबाईलवरुन देवूनही कारवाई झाली नाही. महापालिकेचे अतिक्रिमण विरोधी पथक २५ ऑगस्ट २०२२ रोजी कारवाई करायला जागेवर गेले पण; कारवाई न करता हात हलवत परत माघारी गेले. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे जिना व पोटमाळ्याचे ९९ टक्के बांधकाम झाले आहे. येत्या ८ दिवसात अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्यास आम्ही उपोषणाला बसू, वेळप्रसंगी न्यायालयात जावू.
- प्रकाश झोरे, ज्येष्ठ नागरिक, चिंचवड.

फोटो ः 88765

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96561 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..