चिंचवड सायन्स पार्कमध्ये व्याख्यान व संगीत सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवड सायन्स पार्कमध्ये 
व्याख्यान व संगीत सभा
चिंचवड सायन्स पार्कमध्ये व्याख्यान व संगीत सभा

चिंचवड सायन्स पार्कमध्ये व्याख्यान व संगीत सभा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ ः सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषद यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ‘पेटंट ॲंड कॉपीराइट विषयावर व्याख्यान आणि संगीत संध्या मैफल झाली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे इन्स्टुमेंटेशन अभियांत्रिकी विभागप्रमुख अरुण सोनार यांचे ‘पेटंट ॲंड कॉपीराइट विषयावर व्याख्यान झाले. सायन्स पार्कचे सुनील पोटे व मराठी विज्ञान परिषदेचे राजेंद्र सराफ उपस्थित होते. संगीत सभेत स्वरेशा पोरे- कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग राजेश्री विलंबित एकतालमध्ये बडाख्याल सादर केला. त्यानंतर यमन रागाच्या विविध छटाही सादर केल्या. पद्मनाथा नारायणा या नाट्यगीताने सांगता केली. त्यांना सारंग चिंचणीकर (तबला) आणि पियूष कुलकर्णी (हार्मोनिअम) यांनी साथसंगत केली. स्मिता देशमुख यांनी संयोजन केले.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96661 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..