विकासात आरोग्यासह डिजिटायझेशन हवे सिंगापूर विद्यापीठाचे डॉ. रामकृष्ण यांचे मत; पीसीसीओईमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासात आरोग्यासह डिजिटायझेशन हवे
सिंगापूर विद्यापीठाचे डॉ. रामकृष्ण यांचे मत; पीसीसीओईमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात
विकासात आरोग्यासह डिजिटायझेशन हवे सिंगापूर विद्यापीठाचे डॉ. रामकृष्ण यांचे मत; पीसीसीओईमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

विकासात आरोग्यासह डिजिटायझेशन हवे सिंगापूर विद्यापीठाचे डॉ. रामकृष्ण यांचे मत; पीसीसीओईमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ ः जग वेगाने बदलत आहे. विविध क्षेत्रांचा विकास होत आहे. विकासाच्या प्रक्रियेत आरोग्य सेवा, शाश्वत विकास आणि डिजिटायझेशन यावर भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सिंगापूर येथील राष्ट्रीय विद्यापीठाचे डॉ. श्रीराम रामकृष्ण यांनी केले.
चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे सहाव्या ‘आयक्युबीया २०२२’ आणि पहिल्या ‘आयमेस २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदांच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रामकृष्ण बोलत होते. आयईईई पुणेचे अभिजित खुरपे, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, नरेंद्र लांडगे, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, ‘आयक्युबीया’चे डॉ. महेश कोलते, ‘आयमेस’चे डॉ. पद्माकर देशमुख, कॅपजेमिनी कंपनीचे उपाध्यक्ष अतूल कुरानी, हेनकेल इंडिया कंपनीचे व्यवस्थापक निलेश आडकर, आयईईई पुणेचे खजिनदार डॉ. अमर बुचडे आणि प्रतिनिधी धीरज चौरसिया उपस्थित होते. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदा आयोजित केल्या होत्या. जगात आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता असलेल्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, रोबोटिक्स यांचा वापर करून नावीन्यपूर्ण संशोधन यांना शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे तसेच मॅकेनिकल आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधील नवीन तंत्रज्ञानाचा उहापोह करणे हा परिषदेचा उद्देश होता.
डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘सध्या बहुविद्याशाखीय संशोधन होणे गरजेचे आहे. विविध क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, रोबोटिक्स यांचा वापर करून, नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प करता येतील. हे संशोधन विद्यार्थी आणि संशोधकांना भविष्यात उपयुक्त ठरतील.’’ डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘परदेशातील कंपन्यांनी विद्यार्थी आणि संशोधकांसोबत काम करावे.’’
पीसीसीओईचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी संस्थेची माहिती देऊन संस्थेच्या नवीन विद्यापीठ प्रकल्पाचे सुतोवाच केले. डॉ. निळकंठ चोपडे यांनी ओळख करून दिली. प्रा. वर्षा हरपळे यांनी आभार मानले.

एकूण १५८ संशोधन प्रबंध सादर
प्रा. डॉ. नरेंद्र देवरे व प्रा. डॉ. रचना पाटील यांनी परिषदांचा आढावा घेतला. यामध्ये १५८ संशोधन प्रबंध सादर झाले. १२ संशोधन लेख मलेशिया, फान्स, व्हिएतमान येथील आहेत. डॉ. अजय गायकवाड आणि डॉ. किशोर किणगे यांची सयोजक म्हणून नेमणूक केली. समारोप सत्रात कुरानी म्हणाले, ‘‘आयोटी तंत्रज्ञानाचा वापर करून वास्तविक समस्या सोडवून सर्वसामान्य लोकांचे जीवन सुखी करण्यावर संशोधनाचा भर असावा.’’
आडकर म्हणाले, ‘‘कलात्मकता ही नावीन्यपूर्तीसाठी आवश्यक आहे. कार्बनमुक्त उत्पादनावर भर दिला पाहिजे.’’
डॉ. संदीप माळी यांनी आभार मानले.
....
फोटोः 88901

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96725 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..