प्रादेशिक पक्षांच्या अस्मितेसाठी शिवसेना- संभाजी ब्रिगेडची युती भोसरीमध्ये मनोज आखरे यांचे प्रतिपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रादेशिक पक्षांच्या अस्मितेसाठी
शिवसेना- संभाजी ब्रिगेडची युती
भोसरीमध्ये मनोज आखरे यांचे प्रतिपादन
प्रादेशिक पक्षांच्या अस्मितेसाठी शिवसेना- संभाजी ब्रिगेडची युती भोसरीमध्ये मनोज आखरे यांचे प्रतिपादन

प्रादेशिक पक्षांच्या अस्मितेसाठी शिवसेना- संभाजी ब्रिगेडची युती भोसरीमध्ये मनोज आखरे यांचे प्रतिपादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : शिवसेना व संभाजी ब्रिगेडची युती ही भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी व प्रादेशिक पक्षांची अस्मिता जपणे व वाढविण्यासाठी झाली आहे, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी भोसरी येथे व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शाखेच्यावतीने भोसरी येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक निवासी शाळा येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांच्या उपस्थित गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, जलतज्ज्ञ अनिल पाटील, उद्योजक सचिन वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आखरे म्हणाले की, युतीचा हा निर्णय राज्याच्या हितासाठी घेण्यात आला आहे. समाजाच्या व राज्याच्या विकासासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. या युतीतून निश्‍चितच राज्याचे हित साधले जाणार आहे.
अशोक वानखेडे म्हणाले की, शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांनी युती करून महाराष्ट्राची अस्मिता जपली आहे. या युतीमुळे कोणाचे काय फायदा झाला यापेक्षा कोणाचे किती नुकसान होणार, हा अभ्यासाचा विषय आहे.
कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक मनोजकुमार गायकवाड उपस्थित होते. शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96780 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..