शिक्षक दिन विशेष स्मार्टफोन देऊन मुलींना आणले शिक्षण प्रवाहात शिक्षिकेचा पुढाकार ः किडनीच्या आजाराने त्रस्त मुलीला मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक दिन विशेष 
स्मार्टफोन देऊन मुलींना आणले शिक्षण प्रवाहात 
शिक्षिकेचा पुढाकार ः किडनीच्या आजाराने त्रस्त मुलीला मदतीचा हात
शिक्षक दिन विशेष स्मार्टफोन देऊन मुलींना आणले शिक्षण प्रवाहात शिक्षिकेचा पुढाकार ः किडनीच्या आजाराने त्रस्त मुलीला मदतीचा हात

शिक्षक दिन विशेष स्मार्टफोन देऊन मुलींना आणले शिक्षण प्रवाहात शिक्षिकेचा पुढाकार ः किडनीच्या आजाराने त्रस्त मुलीला मदतीचा हात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ : चौथीमध्ये शिकणारी शालेय विद्यार्थिनी अचानक खेळता-बागडता किडनीच्या त्रासाने शाळेतून घरी बसली. ते पाहून शाळेच्या शिक्षिका अस्वस्थ झाल्या. शेवटी, तिच्या किडनीचा त्रास कमी करुन, अंथरुणाला खिळलेल्या चिमुकलीला बाहेर काढण्यासाठी त्यांनी औषधोपचार स्वखर्चाने सुरु केले. वैद्यकीय बिल आणि दवाखान्याच्या खर्चासाठी सामाजिक संस्थांशी संपर्क साधला. घरातून पौष्टिक आहार पुरविला. एवढेच नव्हे तर, स्वत:चे स्मार्ट फोनही शिक्षणासाठी वाड्यावस्तीवर राहणाऱ्या दोन मुलींना ऑनलाइन शिक्षणासाठी देऊन शिक्षण प्रवाहात आणले.
पिंपरी-चिंचवड महापालिका कन्या दिघी शाळेतील शिक्षिका वनिता उदय नेहे यांची २४ वर्षे शिक्षण सेवा पूर्ण झाली आहे. लॉकडाउनमध्ये त्यांनी ऑनलाइन शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले. चौथीमध्ये शिकणाऱ्या जान्हवी बेंगळेला किडनीच्या आजारातून बाहेर काढले. अद्यापही पुढील १५ वर्ष तिचा औषधोपचार सुरु राहणार असल्याने तिच्यासाठी धावपळ करत आहेत. यासाठी त्यांनी आयुक्त व शिक्षण उपायुक्त यांच्याशीही पत्रव्यवहार केला आहे. दिक्षा पाईकराव व भूमी पाईकराव यांच्याकडे कोविड काळात ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नव्हता. तेव्हा या हतबल मुलींना स्वत:चा स्मार्ट फोन देऊन शिक्षण प्रवाहात आणले.

अशीही कामगिरी...
साहिल गणेश वाघमारे या चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आईच्या पिशवीला गाठ आली. परिणामी, आईचे वजन ३० किलो होऊन हिमोग्लोबिन ५ झाला. त्यामुळे, त्याचे शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आले होते. अशावेळी, वनिता नेहे यांनी वाघमारे यांच्या घरी पौष्टिक आहार, कपडे व औषधे पुरविली. आजारातून त्या वेळेत बाहेर पडल्या. सध्या त्यांचे उपचार सुरु असून, त्या मुलाची शाळा पुन्हा सुरु झाली आहे.
---
पालकांना रोजगार..
जेव्हा पालक सक्षम असेल, तेव्हा पाल्य शिक्षणाचे द्वार पाहू शकतो. ही गरज ओळखून त्यांनी तेजस्विनी भोसले व नम्रता मिठापुरे या चौथी मध्ये शिकणाऱ्या मुलीच्या आई-वडिलांना हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळे, घर आर्थिकदृष्ट्या भक्कम झाले.
---
मदतीबरोबरच निकालही शंभर टक्के
----------------------------------------------------------
वडील रिक्षाचालक असल्याने आरटीइमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला शालेय शुल्क भरणे अशक्य होते. अशावेळी माजी विद्यार्थी अमर एकाडला फोन करून दोन वर्षाचे शालेय शुल्क भरण्याची त्यांनी विनंती केली. शंभर टक्के पटनोंदणी व शंभर टक्के वाचन लेखन यावर त्यांनी भर दिला. कोरोना काळात त्यांनी डिजिटलचा प्लॅटफॉर्म उभा केला. शिवाय, यू ट्युब चॅनेल काढून त्यावरुन मुलांना प्रोत्साहित केले. फुगेवस्तीत अनेकांना किराणा मिळवून दिला. कोविड जनजागृती करुन सर्वांना दिलासा दिला. यामुळेच, पीसीएमसी गॉट टॅलेंट, डिजिटल व स्टार टिचर सारखे पुरस्कार त्यांना मिळाले. मुलांना कौतुकाची थाप मिळावी, यासाठी त्या बक्षिसे स्वखर्चाने वाटप करतात. त्यांच्या वर्गाचा निकालही दरवर्षी शंभर टक्के आहे.
फोटो ः 89057

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96881 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..