आर्मीमध्ये असल्याचे सांगून दोन लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्मीमध्ये असल्याचे सांगून 
दोन लाखांची फसवणूक
आर्मीमध्ये असल्याचे सांगून दोन लाखांची फसवणूक

आर्मीमध्ये असल्याचे सांगून दोन लाखांची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी : फ्लॅट भाड्याने घेण्याचा बहाणा करीत आर्मी असल्याचे सांगत एकाची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार निगडी येथे घडला. याप्रकरणी विवेकानंद कल्याणी मुदकन्ना (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीला फोन करून फ्लॅट पाहिजे असल्याचे सांगितले. आर्मी असल्याचे सांगून डिपॉझिट भरण्यासाठी फिर्यादीचे बँक डिटेल्स व्हॅट्सऍपवर पाठविण्यास सांगितले. आरोपींनी एचडीएफसी बँक अकाउंट क्रमांक फिर्यादी यांच्या वडिलांना पाठवून त्यांच्या बँक अकाउंटला ऍड करण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक अकाउंटवर पैसे भरण्यास सांगून फिर्यादीची एक लाख ९० हजारांची फसवणूक केली.

कामगारानेच चोरला दोन लाखांचा माल
गोडाऊनमध्ये वाहन चालकाचे काम करणाऱ्या कामगारानेच गोडावूनमधील दोन लाखांचा माल चोरल्याचा प्रकार चिखली येथे घडला. या प्रकरणी अब्दुल जलील अन्सारी (रा. बगवस्ती, पाटीलनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मयूर सुशील पाटील (वय २६, रा. बगवस्ती, पाटीलनगर, चिखली) याला अटक केली असून अजय कांबळे याच्यावर गुन्हा दाखल आहे. चिखलीतील बगवस्ती येथे फिर्यादी यांचे सना कार्पोरेशन नावाचे गोडाऊन असून येथे मयूर हा वाहन चालक म्हणून कामाला आहे. मयूर व त्याचा साथीदार अजय यांनी मागील एक महिन्यांपासून दोन लाख रुपये किमतीचा तीन टन ८०० किलो वजनाचा माल चोरला.

विनयभंगप्रकरणी सावत्र वडिलावर गुन्हा दाखल
अश्लील वर्तन करीत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सावत्र बापावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पन्नास वर्षीय सावत्र बापावर गुन्हा दाखल झाला आहे. तो घरी फिर्यादीशी अश्लील वर्तन करायचा. फोनवरून अश्लील बोलायचा. तसेच याबाबत कोठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

म्हाळुंगेत दोन लाखांची फसवणूक
बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून क्रेडिट कार्ड नंबर व इ मेल आयडी घेऊन एकाची दोन लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी नागेश नरसिम्हा पुजारी (रा. पाण्याच्या टाकीजवळ, म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोन केला. आरोपीने बँकेतून बोलत असल्याचे सांगत इ मेल अपडेट करण्यासाठी फिर्यादीकडून क्रेडिट कार्डचा नंबर मागवून घेतला. फिर्यादीस ईमेल आयडी विचारून, त्यांची दिशाभूल करून सुमारे एक लाख ९९ हजार ९९५ रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केली.

चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. तसेच तिच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा प्रकार चिंचवड येथे घडला. याप्रकरणी नसीम खान (वय २२, रा. विद्यानगर, चिंचवड), सलीम खान (वय २८), कैफ (वय २५) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. आरोपी नसीम याने पीडित मुलीचा पाठलाग केला. तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. याबाबत फिर्यादीच्या मुलीने तिच्या भावांना सांगितले असता ते विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी त्या दोघांना मारहाण केली. फिर्यादीची पत्नी सोडविण्यास गेली असता त्यांनाही हाताने मारहाण केली.

पुनावळेत पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास
घरात शिरलेल्या चोरट्याने पावणे तीन लाखाचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार पुनावळेतील ताजणे वस्ती येथे घडला. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीने घराबाहेर ठेवलेल्या चवीने दरवाजा उघडून अथवा फिर्यादीच्या मुलांनी दरवाजा लॉक न करता बाहेर खेळायला गेल्यानंतर चोरटा घरात शिरला. घरातील कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण दोन लाख ८२ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96891 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..