चिंचवडमध्ये तडीपार आरोपीची पोलिसाला धक्काबुक्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये तडीपार आरोपीची पोलिसाला धक्काबुक्की
चिंचवडमध्ये तडीपार आरोपीची पोलिसाला धक्काबुक्की

चिंचवडमध्ये तडीपार आरोपीची पोलिसाला धक्काबुक्की

sakal_logo
By

चिंचवडमध्ये तडीपार आरोपीची
पोलिसाला धक्काबुक्की

पिंपरी, ता. ४ : तडीपार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आरोपीने धक्काबुक्की केल्याचा प्रकार चिंचवड येथे घडला. आकाश ऊर्फ भावड्या भारत कुदळे (वय २७, रा. दळवीनगर रेल्वेलाईन शेजारी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई अमोल गुलाब माने यांनी फिर्याद दिली आहे. कुदळे हा सराईत गुन्हेगार असून त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तरीही तो तडीपार आदेशाचा भंग करून हद्दीत आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता फिर्यादी त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्याने फिर्यादीला धक्काबुक्की करून हाताने ढकलून जमिनीवर पाडले. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96963 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..