शरद गोडसे यांना मान्यवरांची श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद गोडसे यांना
मान्यवरांची श्रद्धांजली
शरद गोडसे यांना मान्यवरांची श्रद्धांजली

शरद गोडसे यांना मान्यवरांची श्रद्धांजली

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : कॉम्रेड शरद गोडसे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

पिंपरी चिंचवडमधील कामगारांनी कामगारांच्या हक्कासाठी लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक लढे केले, त्यात ते अग्रणी नेते होते.
- डॉ. सुरेश बेरी, जेष्ठ कम्युनिस्ट नेते

गेली ५० वर्षे ते कामगार चळवळीत काम करत होते. ग्रीव्ह्‌ज ग्रुप मधील कंपन्यामध्ये आकुर्डी येथील १९७१ ते १९७८ च्या कामगार लढ्यातील ते लढाऊ कार्यकर्ते होते. पिंपरी चिंचवडमधील कामगारांच्या विविध लढ्यात त्यांनी लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली सहभाग घेतला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आयटक या मोठया संघटनेमध्ये त्यांनी ५० वर्षे निष्ठेने काम केले.
- अजित अभ्यंकर, ज्येष्ठ नेते, माकप, पुणे.

कॉम्रेड गोडसे डाव्या चळवळीतील ध्येयनिष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ते होते. काही वर्षे ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये सक्रिय होते. पिंपरी चिंचवड शहरात कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी चळवळीचे केंद्र असावे, या एकाच भावनेतून त्यांनी श्रमशक्ती भवनच्या उभारणीत मोठे योगदान दिले.
- किशोर ढोकले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ.

गेली ४० वर्षे कामगार चळवळीतील विविध आंदोलनामध्ये लाल बावट्याचा विचार कामगार कार्यकर्त्यांना दिला. आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीतील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना वैचारिक प्रशिक्षण देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे ते आयोजक होते.
- मानव कांबळे, अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती.

पिंपरी चिंचवड कामगार चळवळीतील एक लढाऊ व्यक्तिमत्त्व होते. रस्टन, डेव्हिड ब्राऊन या ग्रीव्ह्‌ज ग्रुपमधील कामगारांचा दीर्घकाळ चाललेल्या लढ्यात त्यांचे खूप मोठे योगदान होते.
- क्रांतिकुमार कडुलकर, कार्यकर्ते, माकप.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97282 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..