पर्स हिसकावणाऱ्याला नागरिकांनी पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्स हिसकावणाऱ्याला नागरिकांनी पकडले
पर्स हिसकावणाऱ्याला नागरिकांनी पकडले

पर्स हिसकावणाऱ्याला नागरिकांनी पकडले

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी रस्त्याने जाणाऱ्या दाम्पत्याच्या महिलेकडील पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिकार करताच मारहाण करीत पर्स घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नातील एका चोरट्याला नागरिकांनी पकडले. हा प्रकार चिंचवड, संभाजीनगर येथे घडला. पोलिसांनी अक्षय परमेश्वर लवटे (वय २२, रा. दत्त सोसायटी, म्हेत्रे गार्डनजवळ, चिखली) याला अटक केली आहे. तर सुनील मधुकर अर्जुन (वय २५, रा. दत्त सोसायटी, म्हेत्रे गार्डनजवळ, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल आहे.

फिर्यादी यांच्या पतीच्या मित्राच्या घरी पूजा असल्याने शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास दोघेही त्यांच्या घरी पायी जात होते. दरम्यान, समोरून दुचाकीवरून आलेल्या आरोपीपैकी लवटे याने फिर्यादीची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी प्रतिकार करीत पर्स घट्ट पकडून ठेवली असता धारदार वस्तूने हातावर मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यानंतर लवटे याने पर्स हिसकावून त्याचा साथीदार अर्जुन याच्याकडे दिल्यानंतर दोघेही दुचाकीवरून तेथून निघाले. नागरिक त्यांचा पाठलाग करत होते. काही अंतरावर लवटे दुचाकीवरून उतरून पळू लागला. दरम्यान, पाठलाग करणाऱ्या नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97325 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..