बहुतांश भागात अनंत चतुर्दशिला विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहुतांश भागात अनंत चतुर्दशिला विसर्जन
बहुतांश भागात अनंत चतुर्दशिला विसर्जन

बहुतांश भागात अनंत चतुर्दशिला विसर्जन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : भक्तिभावाने सेवा केल्यानंतर आता लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. सांगवी, भोसरी, तळेगाव वगळता शहराच्या बहुतांश भागात अनंत चतुर्दशीलाच गणेशाचे विसर्जन होणार आहे. प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे.

श्री गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना केल्यानंतर शहराच्या विविध भागात परंपरेप्रमाणे वेगवेगळ्या दिवशी घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होत आहे. सांगवी, तळेगाव दाभाडे येथे सातव्या दिवशी, भोसरीत अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जन होणार आहे. तर पिंपरी-चिंचवड, वाकड, हिंजवडी, रहाटणी, काळेवाडी , चिखली, देहूरोड, मोशी, दिघी, आळंदी, चाकण , म्हाळुंगे, रावेत, शिरगाव, तळवडे यासह इतर भागात अनंत चतुर्दशीलाच बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यंदा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हजार ७४२ सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. यामध्ये अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या मंडळांची संख्या सर्वाधिक आहे.

दरम्यान, मिरवणूक व विसर्जन व्यवस्थित पार पडावे, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मिरवणुकीमुळे या मिरवणूक मार्गासह परिसरातील मार्गावरही वाहतूककोंडीची शक्यता असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पिंपरी, चिंचवड, हिंजवडी आदी भागात हा बदल असेल.

या मार्गावरील मिरवणुकीला अडथळे ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासह रस्तेही दुरुस्त केले जात आहे. पोलिसांनी मिरवणूक मार्गासह विसर्जन स्थळाची पाहणी केली. स्थानिक पोलिसांसह बाहेरूनही बंदोबस्त मागविला आहे.
-----------
सार्वजनिक मंडळांचे असे असेल विसर्जन

दिवस सातवा आठवा नववा दहावा
विसर्जन ४३९ ७ २०५ १०५४

-----------
ठिकाण विसर्जन
सांगवी मंगळवार
तळेगाव दाभाडे मंगळवार
भोसरी गुरुवार
---------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97413 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..