विविध उपक्रमांनी शिक्षक दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध उपक्रमांनी शिक्षक दिन साजरा
विविध उपक्रमांनी शिक्षक दिन साजरा

विविध उपक्रमांनी शिक्षक दिन साजरा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः शहरातील विविध शाळा -महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन साजरा केला. यानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षक दिनाचे महत्त्व, एक दिवस विद्यार्थ्यांनी शाळा चालविणे असे उपक्रम राबविण्यात आले.

न्यू इंग्लिश स्कूल चिंचवड
शाळेतील सर्व विभाग प्रमुखांना आमदार उमा खापरे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी सुनील चिंचवडे, अनिल झेंडे, चारुहास चिंचवडे, योगिता बनकर, माधवी कुलकर्णी यांचा संस्थेतर्फे सत्कार केला. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलकंठ चिंचवडे, तानाजी निंबाळकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनंदा मुळूक यांनी केले.

प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय
राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मनोहर चासकर होते. उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, डॉ. एच. बी. सोनावणे, डॉ. पद्मावती इंगोले, डॉ. अपर्णा पांडे आदींनी मार्गदर्शन केले. डॉ. रामदास लाड यांनी प्रास्ताविक केले. श्रद्धा खिलारे, समृद्धी चव्हाण, पायल परदेशी, आरती साळवे, प्राची सूर्यवंशी, वैष्णवी पुरी, निकिता मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. गोविंद देशमुख यांनी आभार मानले.

यशस्वी इन्स्टिट्यूट
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या वतीने चिंचवड येथे ‘संवाद ''शिक्षकांशी’ कार्यशाळा घेतली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या स्वाती महाळंक यांनी मार्गदर्शन केले. आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी प्रास्ताविक केले. संचालक राजेश नागरे, संजय छत्रे उपस्थित होते. आभार पवन शर्मा यांनी मानले.

सरस्वती माध्यमिक विद्यालय
निगडी - प्राधिकरण सिंधूनगर येथील या विद्यालयात शिक्षकांच्या सत्कार केला. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा. गोविंदराव दाभाडे, सचिव अॅड. सूरज शेलार, अनुप मोरे, नितीन वाघमारे, माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, मुख्याध्यापिका साधना दातीर, मुख्याध्यापक राजू माळे, एकनाथ आमले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विष्णू कुंभारकर यांनी. तर सूत्रसंचालन मोहिनी आणेकर यांनी केले. आभार परशुराम रेंगडे यांनी मानले.

गेंदीबाई हायस्कूल
विद्यार्थी प्राचार्य म्हणून प्रेम कुंभार व विद्यार्थिनी पर्यवेक्षक म्हणून पूर्वा पवार यांनी जबाबदारी पार पाडली. तनिशा लोखंडे, मान्यता शिंदे, खुशी गायकवाड, प्राजक्ता कांबळे, गणेश गवळी यांनी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मांडल्या. संजीव वाखारे व प्रीती गिल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य विक्रम काळे, शशिकांत हुले प्रमुख उपस्थित होते. संयोजन रामनाथ खेडकर व श्रीकांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रविना खरात यांनी केले. रागिणी धुमाळ हिने आभार मानले.

श्रमजीवी माध्यमिक विद्यालय
इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी भावना व्यक्त केल्या. संस्थेचे खजिनदार कारभारी गुलाबराव पुंडे, भास्कर अभिमान कुंभार यांनी शालेय कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत दौंडकर, सचिव नंदकुमार ठाकूर, संचालक विश्वनाथ कोरडे, चंद्रकांत कोरडे, मुख्याध्यापक सुनील भसे उपस्थित होते. सूत्रसंचालन आकाश कमाले यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97603 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..