विधी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधी महाविद्यालयात
शिक्षक दिन उत्साहात
विधी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

विधी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : एसएनबीपी विधी महाविद्यालयात शिक्षक दिन सकाळी अकराला साजरा झाला. यावेळी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञतापर मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रा. डॉ. मोनिका सिंग, शिल्पा जाधव, प्रियांका शिंदे, कैलाश पोळ, स्वप्नील जाधव, टीटू मंथु, प्रिया तोतले, ग्रंथपाल सुभाष राशिवडेकर, गणेश परदेशी उपस्थित होते. प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप अध्यक्षस्थानी होत्या. व्यक्तीच्या जीवनात आई- वडील हे प्रथम गुरू असतात. त्यानंतर शिक्षक हेच गुरू असतात. व्यक्ती व समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे अतिशय महत्त्वाचे योगदान असते. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम केल्याशिवाय यशस्वी वकील किंवा न्यायमूर्ती बनता येत नाही, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप यांनी केले. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत विद्यार्थी प्रसाद लांडे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97668 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..