विसर्जन कुंडांना मंडळांचा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जन कुंडांना मंडळांचा प्रतिसाद
विसर्जन कुंडांना मंडळांचा प्रतिसाद

विसर्जन कुंडांना मंडळांचा प्रतिसाद

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : भक्तिभावाने केलेल्या पाहुणचारानंतर ''गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'' असा जयघोष करीत सातव्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. पावसाने विश्रांती घेतल्याने उत्साहात भर पडली. महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम हौद तयार केले असून त्यातही अनेकांनी विसर्जन केले. मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती जमा केल्या जात होत्या. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सातव्या दिवशी ४३९ मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. सांगवी व तळेगाव दाभाडे येथे रात्री उशिरापर्यंत मिरवणुका निघाल्या.

परंपरेप्रमाणे अनेक घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे सातव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (ता. ६) विसर्जन झाले. सकाळपासूनच थेरगाव विसर्जन घाट, पिंपरीतील सुभाष घाट, निगडीतील गणेश तलाव यासह सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, भोसरी, मोशी, तळवडे, चऱ्होली, आळंदी आदी ठिकाणच्या नदीघाटावर गर्दी होती. कृत्रिम हौदातही मूर्ती विसर्जन करण्यात आले. सायंकाळनंतर नदी घाटावर गर्दी वाढली. डोक्याला रंगीत पट्टी, हातात छोटाशा ताशा अन ‘एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार’ अशा घोषणा देत चिमुकले विसर्जनासाठी येत होते. नदीकडे येणाऱ्या मार्गावर गणेश भक्तांची गर्दी दिसत होती. कुटुंबीयांसह आलेले गणेशभक्त आरती केल्यानंतर गणरायाला निरोप देत होते. पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणही प्रसन्न होते. वाजत-गाजत काढलेल्या मिरवणुकीत काही भक्त नृत्यही करीत होते.

उत्साहाला उधाण
सायंकाळ होताच सार्वजनिक मंडळाचे पडदे खुले होत असून मन प्रसन्न करणारी गणरायाची गाणी, आरती, मंत्रपुष्पांजली कानावर पडत आहेत. धूप, अगरबत्तीचा सुगंध, विविध फुलांचा दरवळ यामुळे वातावरणात आणखीनच प्रसन्नता निर्माण होते. सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे.

रस्ते फुलले
विसर्जनासाठी अवघे तिचं दिवस उरले असल्याने देखावे पाहण्यासाठीही मोठी गर्दी होत आहे. अनेकजण सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी येत आहेत. दरम्यान, देखाव्याची ठिकाणी खेळण्यात बसण्याची मजा चिमुकले घेत असून त्यांच्यासाठी आनंद पर्वणीच असल्याचे दिसून येत आहे. रस्ते गर्दीने फुलले असल्याचे दिसून येत आहे.

पावसाची विश्रांती
प्रतिष्ठापनेच्या दिवसासह नंतरही तीन-चार दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकजण घराबाहेर पडले नाही. देखावे पाहण्यालाही गर्दी नव्हती मात्र, आता पावसाने विश्रांती घेतली असून सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. त्यामुळे मंडळांनीही देखाव्यांना सायंकाळी लवकरच सुरुवात केली.

मोदक आणि गोड पदार्थ
लाडक्या गणरायाचा आवडता मोदक यासह इतरही गोड पदार्थ प्रसादासाठी बनविण्याची लगबग घरोघरी दिसून येत आहे. आज कोणता पदार्थ बनवायचा याचे सकाळपासूनच नियोजन केलेले असते. दरम्यान, अशा पदार्थाचा सुगंध घरोघरी दरवळत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97817 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..