शिक्षकांना रजा; कर्मचाऱ्यांना भत्ता महापालिका प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता; वाहन दुरुस्तीसाठी ७० लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांना रजा; कर्मचाऱ्यांना भत्ता
महापालिका प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता; वाहन दुरुस्तीसाठी ७० लाख
शिक्षकांना रजा; कर्मचाऱ्यांना भत्ता महापालिका प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता; वाहन दुरुस्तीसाठी ७० लाख

शिक्षकांना रजा; कर्मचाऱ्यांना भत्ता महापालिका प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता; वाहन दुरुस्तीसाठी ७० लाख

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांना अर्जित रजा लागू करणे, महापालिका आस्थापनेवरील गट क आणि ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिकालीन भत्ता देणे, यांसह महापालिका सभा, स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक सिंह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी उपस्थित होते. महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांमध्ये कामांच्या नावात बदल, तरतूद वर्गीकरण अशा विषयांचा समावेश होता. तर, स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या तरतूद वर्गीकरणासह विविध विषयांचा समावेश होता. त्यांना मान्यता देण्यात आली. महापालिका मालकीच्या वाहनांची उत्पादित कंपनीच्या अधिकृत विक्रेत्यांकडून सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या अंदाजे ७० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चास प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.

अर्धवेतनी ऐवजी पूर्णवेतनी रजा
महापालिकेच्या सर्व शाळा दीर्घ सुट्टी विभागात येत असल्याने प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक, शिक्षक सेवक यांना अर्जित रजा लागू करण्याच्या विषयाला राज्य सरकारच्या निर्णयानुसार प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. या शिक्षकांना आता मिळत असलेल्या २० अर्धवेतनी अनअर्जित रजा ह्या १० पूर्णवेतनी अर्जित रजांमध्ये परिवर्तित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांना या १० अर्जित रजा प्रत्येक कॅलेंडर वर्षात घेता येतील.

कर्मचाऱ्यांना अतिकालीन भत्ता
महापालिका आस्थापनेवर क आणि ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ काम करावे लागते. अत्यावश्यक सेवा वगळून विभागप्रमुखांच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या विहित कालमर्यादेत प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांना ४८ तासांच्या मर्यादेपर्यंत अतिकालीन भत्ता देय राहील. अन्य विभागांसाठी त्यांच्याकडील कामकाजासाठी आवश्यक कर्मचारी विचारात घेऊन ठराविक कालावधीसाठी ४८ तासांपर्यंत अतिकालीन भत्ता देय राहील.

पीसीएमसी पब्लिक स्कूल
महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बोधचिन्ह, घोषवाक्य, नाव व एकसारखे दिशादर्शक चिन्हे लावण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्यामुळे शाळांमध्ये ‘पीसीएमसी पब्लिक स्कूल’ असे नामफलक लावले जाणार आहेत. ‘ज्ञानमेव शक्ती’ हे घोषवाक्य असेल. शाळा कार्यालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, मुला-मुलींचे स्वच्छतागृह असे एकाच आकारातील व रंगातील फलक असतील.

रखवालदार, मदतनीस नियुक्ती
महापालिकेच्या मिळकती, उद्याने व जलकुंभांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने ४७ रखवालदार व एक हजार ३०५ मदतनीस नियुक्त केले जाणार आहेत. त्यांना मूळवेतन व महागाई भत्ता मिळून १८ हजार ५७० रुपये वेतन देण्याच्या विषयासही मान्यता दिली.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97918 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..