महापालिकेतील ३८६ पदांसाठी ६२ हजार ४५२ अर्ज प्राप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेतील ३८६ पदांसाठी 
६२ हजार ४५२ अर्ज प्राप्त
महापालिकेतील ३८६ पदांसाठी ६२ हजार ४५२ अर्ज प्राप्त

महापालिकेतील ३८६ पदांसाठी ६२ हजार ४५२ अर्ज प्राप्त

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः महापालिकेच्या विविध विभागातील ब आणि क संवर्गातील १६ पदांच्या ३८६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तब्बल ६२ हजार ४५२ जणांनी अर्ज केले आहेत. महापालिकेत सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. त्या जागांवर सरळसेवेतून नियुक्त करण्यास सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यातील सर्वाधिक २१३ जागा लिपिक पदासाठी आहेत. कनिष्ठ अभियंता ७५, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ४१, विद्युत कनिष्ठ अभियंता १८, आरोग्य निरीक्षक १३ जागा आहेत. लिपिक पदासाठी २२ व कनिष्ठ अभियांत्रिकी पदासाठी २१ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. ३३ हजार उमेदवारांनी एक हजार रुपये परीक्षा शुल्क जमा केले आहे. परीक्षा शुल्कासह गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करायची मुदत आहे. एक लाख अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. खासगी एजन्सीमार्फत नोव्हेंबरमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97939 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..