गुलालविरहीत आठ तास विसर्जन मिरवणूक तळेगावात ढोलताशांचा दणदणाट, रिमझिम पावसात कार्यकर्त्यांचा उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुलालविरहीत आठ तास विसर्जन मिरवणूक
तळेगावात ढोलताशांचा दणदणाट, रिमझिम पावसात कार्यकर्त्यांचा उत्साह
गुलालविरहीत आठ तास विसर्जन मिरवणूक तळेगावात ढोलताशांचा दणदणाट, रिमझिम पावसात कार्यकर्त्यांचा उत्साह

गुलालविरहीत आठ तास विसर्जन मिरवणूक तळेगावात ढोलताशांचा दणदणाट, रिमझिम पावसात कार्यकर्त्यांचा उत्साह

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ७ ः ढोल-ताशांचा दणदणाट आणि डीजेच्या तालावर नाचणारे तरुण अशा जल्लोषात व मंगलमय वातावरणात मानाचा पहिला गणपती श्री डोळसनाथ तालीम मंडळाच्या गणपतीची आरती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लांडगे व मंडळाचे अध्यक्ष तुषार साळुंके यांच्या हस्ते झाली.
ढोल-ताशांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या’ चा जयघोष करत दोन वर्षाच्या कालखंडानंतर रिमझिम पावसात नाचणारे कार्यकर्ते...अशा उत्साही वातावरणात येथील सात दिवसांच्या गणेशोत्सवाची मंगळवारी सांगता झाली. गुलालविरहीत मिरवणूक हे यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. येथील मुख्य विसर्जन मिरवणुकीला डोळसनाथ आळीतून सायंकाळी साडेसहाला सुरवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी पाच घोडे असलेल्या सूर्य रथात डोळसनाथ मंदिराची मूर्ती विराजमान झाली होती. मिरवणुकीत कालिका गणेशोत्सव मंडळ, तेलीसमाज गणेशोत्सव मंडळ, राजेंद्रचौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश तरुण मंडळ या पाच मानाच्या गणपतीसह तरुण ऐक्य मंडळ, विक्रांत मंडळ, सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ, फ्रेन्ड्स क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, जयभवानी तरुण मंडळ, शेतकरी मंडळ, भेगडे तालीम मित्र मंडळ आदी मंडळांचा मिरवणुकीत सहभाग होता तर शहरातील अन्य मंडळानी दुपारीच स्वतंत्रपणे मिरवणुकीने गणपतीचे विसर्जन केले.
मिरवणुकीसाठी सर्वच मंडळांनी यंदा फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली होती. ढोल-ताशा पथकांतील तरुण मुलींनी तसेच तेली समाज मंडळातील दहा वर्षाचा मोहित देविदास जाधव याने ताशा वाजवून गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले. पोलिसांनी वाद्य वाजविण्यासाठी बारापर्यत वेळ दिली होती. ती सर्व मंडळानी तंतोतंत पाळली. नगरपरिषदेच्यावतीने मुख्याधिकारी विजयकुमार सरदेसाई यांच्या हस्ते शाळा चौकात सर्व गणेश मंडळांचे सन्मान चिन्ह देवून स्वागत करण्यात आले. तसेच विक्रांत मंडळ व विवेकानंद मित्र मंडळ यांच्यावतीने मंडळांचे स्वागत करण्यात आले. नगरपरिषदेच्यावतीने गाव तळ्याजवळ निर्माल्य कलश ठेवण्यात आला होता. मूर्ती संकलनाला अल्प प्रतिसाद मिळाला. बहुतेक गणेश भक्तांनी गावतळे व स्टेशन तळे येथे गणेश मूर्तीचे विसर्जन केले. काही जणांनी कृत्रिम हौदात गणेश विसर्जन केले. पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लांडगे यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक शांततेत पार पडली. रात्री अडीचच्या सुमारास मिरवणुकीची सांगता झाली.

----------------------------
फोटोः ८९९०३

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97974 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..