पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमचीच सत्ता येणार शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे भाकीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड महापालिकेत
 आमचीच सत्ता येणार
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे भाकीत
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमचीच सत्ता येणार शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे भाकीत

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमचीच सत्ता येणार शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे भाकीत

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : मुळातच भाजप-शिवसेना एकत्र आहोत. त्यामुळे आमचे (शिंदे-फडणवीस) सरकार मुंबई महापालिका जिंकेल तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकाही जिंकू. याशिवाय राज्यातील सगळ्या नगरपालिका तर जिंकूच पण; सगळ्या जिल्हा परिषदाही जिंकू, असे भाकीत शिंदे गटाचे प्रवक्ते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी रहाटणी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
रहाटणीतील ‘एसएनबीपी’ या खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी केसरकर यांनी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आदी यावेळी उपस्थित होते.

शिवसेना आणि शिंदे गटातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकांबाबत केसरकर म्हणाले की, न्यायालयाच्या कामकाजाबाबत काही बोलणार नाही. लोकशाही मजबूत करणारे निकाल असतील, अशी मला खात्री आहे.
शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचा की शिंदे गटाचा होणार, याबाबत विचारले असता, केसरकर म्हणाले, ‘‘आमचे मुख्यमंत्री खूप काम करतात. लोकांच्या आनंदात सहभागी होतात. दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे घोषणा करतील. मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत म्हणून बाळासाहेबांच्या विचारासाठी जशा लढा दिला. तसेच त्यांच्या प्रथा-परंपरा कायम ठेवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. परंतु, दसरा मेळाव्याबाबत काय करायचे, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांबद्दल त्यांना असलेला आदर आणि बाळासाहेबांची भूमिका, व्यापक हिंदुत्वाचे तत्व पुढे घेऊन शिंदेसाहेब चालत आहेत. त्यात कुठलेही राजकारण येऊ देणार नाही.’’

चौकट
-------
बावनकुळे - आमदार जगताप भेट
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता. ७) भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बावनकुळे यांनी आमदार जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, माजी महापौर माई ढोरे, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, भाजप चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख शंकर जगताप, शत्रुघ्न काटे, अनुप मोरे आदी उपस्थित होते.
फोटो ः 90013

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98135 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..