वर्क फ्रॉम ऑफिससाठी बड्या आयटी कंपन्यांच्या कुल्प्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्क फ्रॉम ऑफिससाठी बड्या आयटी कंपन्यांच्या कुल्प्त्या
वर्क फ्रॉम ऑफिससाठी बड्या आयटी कंपन्यांच्या कुल्प्त्या

वर्क फ्रॉम ऑफिससाठी बड्या आयटी कंपन्यांच्या कुल्प्त्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : हिंजवडी, तळवडे, मगरपट्टा भागातील बड्या आयटी कंपन्यांनी आता ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ पुन्हा कसे सुरू होईल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. कोविड काळाच्या दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही ‘वर्क फ्रॉम होम’ व ‘हायब्रीड स्टाइल’ काम सुरु आहे. मात्र, कामाचे योग्य मूल्यमापन होवून निकषापर्यंत लवकर पोहोचता येते म्हणून कर्मचारी ऑफिसमध्ये येण्यास उद्युक्त
व्हावे यासाठी कंपन्यांनी इनडोअर गेम, छोट्या सहली, हॉटेल पार्ट्यांच्या आयोजनावर भर दिला आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मिळून सुमारे आठ हजार कंपन्या आहेत. या आयटी हबमध्ये तीन लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. गेल्या दोन वर्षात घरातून काम सुरु असल्याने आता कंपनीत येऊन काम करण्याची मानसिकताच कर्मचाऱ्यांची नाही. त्यामुळे
बड्या कंपन्यांमधून सध्या एच.आर ॲक्टिविटी, विविध टार्गेट मिळविल्यानंतर कॉम्पलिमेंटरी गिफ्ट देणे, विविध छोट्या मोठ्या गेम्सचे कामाच्या वेळेत आयोजन करणे अशा विविध प्रकारे त्यांच्यात परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. बऱ्याच कंपन्यांनी हे कल्चर कोविड काळानंतर सुरु केले आहे. मात्र, सध्या ९० टक्के कंपन्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसमवेत विविध ॲक्टिविटी राबविण्यावर भर दिला आहे.

बऱ्याच देशांमध्ये इनडोअर ॲक्टिविटीचा फंडा वापरला जातो. भारतातील आयटी कंपन्यांनीही ही पध्दत अवलंबण्यास सुरुवात केली आहे. ज्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती करत आहेत, त्याचा उलट परिणाम असाही समोर आला आहे की, बरेच कर्मचारी पहिली कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत नोकरी शोधून तात्काळ बदलत आहेत. तर, काही कर्मचाऱ्यांची मानसिकता अद्यापही वर्क फ्रॉम होम मधून बाहेर पडण्याची नाही. त्यामुळे, कंपन्यांनी कितीही फंडे वापरले तरीही, ते घरातूनच काम करत आहेत.
---
घरातून काम करताना स्वत:साठी वेळ देता येतो. शारिरीक हालचाल होते. घरातील पौष्टिक अन्न मिळते. व्यायाम हव्या त्या वेळेत करता येतो. तसेच, इतर छोटी कामे असल्यास ती उरकता येतात. कुटुंबाला वेळ देता येतो. कंपन्यांमध्ये गेल्यास आठ ते बारा तास एकाच जागी खिळवून राहावे लागते. त्यातही, वाहतूक कोंडीतून सुटका होत नसल्याने कामावर जाण्याची मानसिकता राहत नाही. थकवा जाणवतो. दोघेही पती-पत्नी नोकरी करत असल्यास घरातील जबाबदारी तसेच मुलांकडेही लक्ष देता येते. महिला नोकरदार असेल तर, घर सांभाळून स्वत:च्या नोकरीसाठी वेळ देता येतो. त्यामुळे, अनेकजण कंपन्यांनी कामावर बोलावल्यास जाण्यास तयार होत नाहीत. पर्यायाने, ते कामावर जाण्या ऐवजी कंपनी बदलण्याचा निर्णय स्वीकारत आहेत. मी आठवड्यातून एकदा कंपनीतील कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो.
- एक कर्मचारी, तळवडे
-

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98166 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..