हॅरीस ब्रिजवरील वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॅरीस ब्रिजवरील वाहतुकीत बदल
हॅरीस ब्रिजवरील वाहतुकीत बदल

हॅरीस ब्रिजवरील वाहतुकीत बदल

sakal_logo
By

पिंपरी, ता.७ ः मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी येथील मुळा नदीवरील हॅरिस ब्रिजवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने पूलालगतच्या नवीन पुलावरून न येता नवीन पुलाच्या सुरवातीस उजव्या बाजूकडे वळून जुन्या हॅरिस ब्रिजच्या डाव्या लेनपुढे येऊन बोपोडी चौकातून पुढे खडकी बाजार मार्गे पुण्याच्या दिशेने जातील. भाऊ पाटील रस्त्याकडून येणारी वाहने व पुण्याच्या दिशेने जाऊ इच्छिणारी वाहने ब्रिजच्या अंडरपासने पुढे न येता वि. भा. पाटील पुलावरून पुढे शिवाजी पुतळा चौक दापोडी येथून डावीकडे वळून पुढे फुगेवाडी पुलावरून उजवीकडे वळून बोपोडी चौक-खडकी बाजार मार्गे पुण्याच्या दिशेने जातील किंवा आंबेडकर चौकातून पुढे साई चौक-चर्च अंडरपास-चर्च चौक पुढे पुण्याच्या दिशेने जातील. यासंबंधीचे आदेश वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98171 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..