पुरवठादार, कंत्राटदारांना देयकांसाठी ४५ दिवस मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरवठादार, कंत्राटदारांना
देयकांसाठी ४५ दिवस मुदत
पुरवठादार, कंत्राटदारांना देयकांसाठी ४५ दिवस मुदत

पुरवठादार, कंत्राटदारांना देयकांसाठी ४५ दिवस मुदत

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ ः वस्तू व सेवा पुरवठादार, कंत्राटदार यांनी पुरवठा अथवा कामे केल्यानंतर संबंधित कामांची देयके ४५ दिवसांच्या आत लेखा विभागाकडे सादर करावित. त्यानंतर विलंबाने देयके सादर करणाऱ्या पुरवठादारांना संबंधित देयकांच्या अदायगीसाठी आयुक्तांची मान्यता घेणे बंधनकारक आहे.
महापालिकेतर्फे शहरात विविध विकास प्रकल्पांची उभारणी व नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी विविध विभागांना दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. त्यानुसार विभागांना निधी दिला जातो. या तरतुदी त्याच आर्थिक वर्षात नियोजित बाबींकरीता खर्च करणे अपेक्षित असते. परंतु वस्तू व सेवा पुरवठादारांद्वारे पुरवठा केल्यानंतर ४५ दिवसांच्या आत लेखा विभागाकडे देयके सादर करणे बंधनकारक केले आहे, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी सांगितले. तसेच, महापालिका अधिकाऱ्यांना व विविध विभागांना वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी प्रिपेड पेट्रो कार्डचा वापर करणे बंधनकारक केले आहे. तसेच, वस्तू व सेवा पुरवठादार व कंत्राटदारांना इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा (ईसीएस) प्रणालीद्वारे देयके अदा करणे बंधनकारक केले असल्याचेही कोळंबे यांनी सांगितले.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98363 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..