ऑनलाइन बँकिंगद्वारे सव्वा चार लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाइन बँकिंगद्वारे 
सव्वा चार लाखांची फसवणूक
ऑनलाइन बँकिंगद्वारे सव्वा चार लाखांची फसवणूक

ऑनलाइन बँकिंगद्वारे सव्वा चार लाखांची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी : पॅनकार्ड अपडेटचा मेसेज करून रामचंद्र दगडू जाधव (रा. शिवनगरी, दिघी) यांची ऑनलाइन बँकिंगद्वारे चार लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केली. अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या मोबाईलवर मेसेज करून बँकेचे अकाउंट बंद होणार असून पॅनकार्ड अपडेट करा, असा इंग्रजीत खोटा मेसेज केला. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, कासारवाडी येथील सेव्हिंग अकाउंटमधून ४९ हजार ९९९ रुपये व एफडी अकाउंटमधील तीन लाख ७४ हजार ९९९ रुपये असे एकूण ४ लाख २४ हजार ९९८ रुपयांची ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक केली.

पीएमपी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) भरधाव बसच्या धडकेत उमेश लालचंद राठोड (वय २२, रा. आकुर्डी, मूळ- औरंगाबाद) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी येथे घडली. या प्रकरणी जावेद आबेद शेख (वय ५०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) या चालकावर गुन्हा दाखल आला आहे. कासारवाडीतील नाशिक फाटा येते बीआरटी मार्ग ओलांडत असताना शेख याने राठोड यांना जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दिघीत जुन्या भांडणातून टोळक्याची मारहाण
दिघी येथे जुन्या भांडणातून सहा जणांच्या टोळक्याने राहुल हरिभाऊ अंधारे (वय १९, रा. दिघी गावठाण) या तरुणाला मारहाण केली आहे. या टोळक्यातील योगेश सुरेश जोगे (वय १९), अमित अंकुश इंगवले (वय २२), सोहेल अलिशीयर मिर्झा (वय १९), ताकीर हुसेन आशिष चिंतापरम (वय १८, सर्व रा. दिघी) यांना दिघी पोलिसांनी अटक केली असून दोघे पसार आहेत. आरोपी यांचा मित्र रोहीत जाधव याला आधी कोणी तरी मारहाण केली होती. याचा राग मनात धरून आरोपींनी राहुलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या नाकावर कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच परिसरात दहशत माजवली.

लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून प्रदीप केशव गिते (रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) याने महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गित्ते याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्याने महिलेसोबत वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला दुसऱ्या कोणासोबतही लग्न करू दिले नाही.


शाळकरी मुलींना त्रास देणाऱ्यावर गुन्हा
निगडीतील भेळ चौक येथे शाळेतून दोन मैत्रिणी पायी घरी जात असताना एकाने त्यांना अडवून गाडी अंगावर घालण्याची धमकी देत त्रास देण्याचा प्रयत्न केला. कुणाल विनायक गवारे (वय २७, रा. प्राधिकरण, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची १५ वर्षीय मुलगी व तिची मैत्रीण दोघी शाळेतून घरी पायी जात असताना आरोपीने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. वारंवार पाठलाग करून गाडीवर बस नाहीतर तुझ्या अंगावर गाडी घालीन, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांची मुलगी व तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केला.

चिखलीत तीन लाखांची घरफोडी
चिखलीतील राजे शिवाजीनगर, प्राधिकरण येथे दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने सोने- चांदीचे दागिने व रोकड असा तीन लाख १५ हजारांचा ऐवज चोरला. याप्रकरणी नितीन धोंडिराम फडतरे (वय ४२, रा. राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची बहीण सविता दशरथ शिंदे यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यान, त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज चोरून नेला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98366 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..