निरोपासाठी यंत्रणा सज्ज गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; आपत्ती व्यवस्थापन, जीवरक्षक तैनात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरोपासाठी यंत्रणा सज्ज
गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; आपत्ती व्यवस्थापन, जीवरक्षक तैनात
निरोपासाठी यंत्रणा सज्ज गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; आपत्ती व्यवस्थापन, जीवरक्षक तैनात

निरोपासाठी यंत्रणा सज्ज गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; आपत्ती व्यवस्थापन, जीवरक्षक तैनात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ ः दहा दिवसांच्या आनंदोत्सवाची अर्थात गणेशोत्सवाची शुक्रवारी (ता. ९) सांगता होत आहे. त्यानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळांसह सोसायट्यांच्या मिरवणुकी निघणार आहेत. त्यामुळे नदी घाटांसह अन्य विसर्जन घाटांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्व ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवली असून, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जीवरक्षकही तैनात आहेत.
महापालिकेने शहरातील प्रमुख दहा गणेश विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ठेवल्या आहेत. यांसह इतर घाटांवर जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहेत. घाटांवर विसर्जन हौद उभारले असून स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन सुरू आहे. २६ घाटांवर लाइफ जॅकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात आहेत. वैद्यकीय साहित्य, औषधे आणि रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात ठेवले आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका वाहनचालक, सफाई कामगारांचा समावेश आहे.

आपत्ती व्यवस्थापन संघ भोसरी, ॲडव्हेंचर क्लब थेरगाव आणि जीवरक्षक संस्था, सांगवी या संस्थांचे सदस्य जीवरक्षक म्हणून नदी घाटांवर कार्यरत आहेत. सर्पमित्रांचीही मदत घेतली जाणार आहे. स्वच्छतेसाठी सर्व घाटांवर सफाई कर्मचारी नियुक्त केले आहेत. नियमित साफसफाईवर भर दिला आहे.
- ओमप्रकाश बहिवाल, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महापालिका

महत्त्वाचे विसर्जन स्थळे
- पवना नदी ः रावेत घाट, पुनावळे घाट, वाल्हेकरवाडी जाधव घाट, थेरगाव केजुदेवी घाट, चिंचवड थेरगाव पूल घाट, चिंचवड मोरया गोसावी घाट, केशवनगर, काळेवाडी घाट, पिंपरी सुभाषनगर झुलेलाल घाट, पिंपरीगाव घाट, रहाटणी घाट, पिंपळे गुरव घाट, कासारवाडी घाट, फुगेवाडी घाट, दापोडी घाट, नवी सांगवी घाट, जुनी सांगवी घाट
- मुळा नदी ः वाकड विसर्जन घाट, पिंपळे निलख घाट, सांगवी मुळानगर घाट, संगमनगर घाट, दापोडी स्मशानभूमीजवळील घाट, बोपखेल घाट
- इंद्रायणी नदी ः तळवडे घाट, चिखली घाट, मोशी घाट, डुडुळगाव घाट, चऱ्होली घाट
- खाणी, विहिरी, तलाव ः मोशी येथील दगड खाणी, भोसरी गावजत्रा मैदानातील विहिरी, गणेश तलाव प्राधिकरण, वाकड दगड खाण
(टीप ः सर्व घाटांसह अन्य गणेश विसर्जन ठिकाणी कृत्रिम हौद उभारले असून, त्या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र आहेत)

महापालिकेची तयारी
- महापालिकेसह खाजगी संस्थांनी कृत्रिम हौद उभारले आहेत
- विसर्जन घाटांवर दिशादर्शक व स्थळदर्शक फलक लावले आहेत
- घाटांवरील निर्माल्यकुंडांची माहिती होण्यासाठी फलक लावावेत
- स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जीवरक्षक नियुक्त केले आहेत
- अग्निशमन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित आहे

भाविकांनी काय करावे
- विसर्जन मिरवणुकीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे
- भाविकांनी खबरदारी म्हणून शक्यतो मास्क वापरावा
- बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत
- पिंपरी, चिंचवडमधील रस्ते बंद ठेवल्याने पर्यायी मार्ग वापरावेत
- मूर्ती व निर्माल्य नदीपात्रात न टाकता दान करावे

दृष्टिक्षेपात विसर्जन तयारी
अग्निशामक जवान ः ६०
अग्निशामकच्या बोटी ः ३
अग्निशामक बंब ः ५
स्वयंसेवी संस्था ः ३०
स्वयंसेवक संख्या ः ४५
रुग्णवाहिका ः १३
----

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98380 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..