शहराला होर्डिंग्जची आरास गणेशोत्सवात होर्डिंग्जचे देखावे विद्रुप करताहेत परिसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहराला होर्डिंग्जची आरास

गणेशोत्सवात होर्डिंग्जचे देखावे विद्रुप करताहेत परिसर
शहराला होर्डिंग्जची आरास गणेशोत्सवात होर्डिंग्जचे देखावे विद्रुप करताहेत परिसर

शहराला होर्डिंग्जची आरास गणेशोत्सवात होर्डिंग्जचे देखावे विद्रुप करताहेत परिसर

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ ः शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने बहुतांश सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी मोठ-मोठे होर्डिंग्ज लावून मुख्य रस्ता, तलाव आणि विसर्जन घाट व चौकात विद्रूपीकरण केले आहे. या अनधिकृत होर्डिंग्जमुळे ऐन उत्सवात बकालपणा आला आहे. मात्र, महापालिका यंत्रणेकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याचे व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे महापालिकेला आदेश आहेत. परंतु, असे असतानाही महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई दिसत नाही. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी शहर होर्डिंग्ज मुक्तीसाठी स्वतंत्र परिपत्रक काढून नियमावली जाहीर केली आहे. तरीही त्यांच्याच खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याचा विसर पडला आहे.

इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त इच्छुकांकडून शुभेच्छा फलक लावले आहेत. गणेश मंडळापासून दूर अंतरावर मुख्य रस्ते, चौक-चौकात, बस स्‍थानकांवर आणि विसर्जन घाटावर त्या-त्या पक्षप्रमुखांसह स्‍थानिक राजकीय नेत्यांसह स्वत:चे फोटो झळकविण्यासाठी मोठी होर्डिंग्ज लावली आहेत. स्वागत कमानी उभारून त्यावर स्वतःचे छायाचित्र लावले आहे. याच होर्डिंग्जद्वारे पक्षातील नेत्यांना खूष करण्यासाठी व त्यांचे लक्ष वेधण्यासाठी स्वत:ची माहितीही त्यावर दिमाखात झळकावली आहे. यामध्ये काहींनी तर आरक्षण निश्‍चित नसल्याने स्वत:सह पत्नीचे तर काहींनी तर आई-वडिलांचेही फलक लावून या विद्रुपीकरणात भरच घातली आहे. याकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आदेशाचा विसर
शहर होर्डिंग्जमुक्तीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत महापालिकेने काढलेले स्वतंत्र परिपत्रक नावालाच राहिलेले आहे. परिपत्रकानुसार कुठलाही समारंभ, वाढदिवस, स्वागत असो की धार्मिक, दशक्रिया विधी, व्यावसायिक जाहिरातींना महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. अवैध होर्डिंग्ज दिसताच गुन्हे दाखल करण्याचे आदेश करण्यात येतील.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98471 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..