पिंपरी, चिंचवडमधील मिरवणुकांवर लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी, चिंचवडमधील मिरवणुकांवर लक्ष
पिंपरी, चिंचवडमधील मिरवणुकांवर लक्ष

पिंपरी, चिंचवडमधील मिरवणुकांवर लक्ष

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः अनंत चतुर्दशीला पिंपरीतील संत तुकाराम महाराज चौक (कराची चौक) आणि चिंचवड येथील चापेकर चौकातील मिरवणुका पाहण्याची उत्सुकता अधिक असते. यंदा अर्थात शुक्रवारी (ता. ९) सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीत कोणकोणते रथ असतील, याची उत्सुकता अधिक आहे.

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, खराळवाडी, मोरवाडी, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, कामगारनगर, नेहरूनगर, महेशनगर, संत तुकारामनगर, फुलेनगर, वल्लभनगर, काळेवाडी आदी भागातील मंडळे पिंपरीतील सुभाषनगर येथील झुलेलाल घाटावर मूर्ती विसर्जन करतात. तर, चिंचवडगावासह चिंचवड स्टेशन, मोहननगर, विद्यानगर, शाहूनगर, संभाजीनगर, काळभोरनगर, थेरगाव, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, भोईरनगर, आनंदनगर, इंदिरानगर, एमआयडीसी आदी भागातील मंडळे चिंचवडमधील थेरगाव पूल व मोरया घाटांवर विसर्जन करतात. या मंडळांचे स्वागत पिंपरीतील कराची चौक व चिंचवडच्या चापेकर चौकात महापालिका करते. मिरवणूक मार्गासह दोन्ही चौकात मंडळे आपापले खेळ सादर करतात. वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्ररथ मंडळांचे असतात. ते पाहण्यासाठी दोन्ही चौकात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे शुक्रवारच्या मिरवणुकांबाबत उत्सुकता वाढली आहे.

ज्ञानप्रबोधिनीची तयारी
प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाची मिरवणूक दरवर्षी अविस्मरणीय असते. गुरुकूलमधील विद्यार्थ्यांचा फिकट गुलाबी सदरा, पांढरी विजार, डोक्यावर पांढरी टोपी असा विद्यार्थ्यांचा पेहराव असतो. लेझीम पथक व त्यांचे खेळ हेही एक आकर्षण असते. यावर्षी पाच प्रदेशातील नृत्य, प्रांतवार वेशभूषा, क्रांतिकारकांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, बर्ची नृत्याचे आयोजन विद्यालयाने केले आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजता विद्यालयातून मिरवणूक निघेल. विशाल कॉर्नर, गायत्री हॉटेल, काचघर चौक, उद्घोष तरुण मंडळ मार्गे रावेत घाटावर मिरवणूक पोहचेल. त्यात ३५ गट असतील.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांचा एक गट असेल. नचिकेत बालग्रामच्या ४० विद्यार्थ्यांचा एक गटही सहभागी असेल. क्रांतिकारकांच्या वेशभूषेतील काही विद्यार्थी असतील. वेगवेगळे गट कश्मीर, दक्षिण भारत, गुजरात, महाराष्ट्र, पूर्व भारतातील सात राज्ये, पंजाब, पश्चिम बंगाल या प्रांतातील पोशाखाची वेशभूषा विद्यार्थी करणार आहेत. त्या भागातील पद्य, अभंग, भजन, घोषणांचे सादरीकरणही केले जाईल. पंजाबी, आसामी, राजस्थानी, गुजराती, गोवा या पाच राज्यातील कला, नृत्यप्रकार सादर होतील. क्रीडा कुलचे विद्यार्थी मल्लखांबांचे प्रात्यक्षिकाचे सादर करतील.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98477 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..