काळेवाडीत दोन टोळीत हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळेवाडीत दोन टोळीत हाणामारी
काळेवाडीत दोन टोळीत हाणामारी

काळेवाडीत दोन टोळीत हाणामारी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० : काळेवाडी येथे वर्चस्ववादातून दोन टोळीत जोरदार हाणामारी झाली. एकमेकांवर कोयत्याने वार करून हवेत कोयता भिरकावून दहशत माजवली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

अश्विन राहुल सिंग (वय १७, रा. जयहिंद विहार कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) व एका महिलेने वाकड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. अश्विनने दिलेल्या फिर्यादीनुसार, मन्या ऊर्फ प्रतीक संजय घोडके (वय २२, रा. काळेवाडी) याला अटक केली आहे. तर त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर, महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, अभी निंबाळकर, अश्विन सिंग, अनुज गोळे, गौरव इंगवले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अश्विनने दिलेल्या फिर्यादीनुसार, अश्विन व त्याचे मित्र कुणाल चौधरी, तेजस वराडे व अनुज गोड हे काळेवाडीतील जीवन चौक येथून पायी जात होते. त्यावेळी काही मुले दारू पिऊन मोठमोठ्याने शिव्या देत होती. अश्विनने त्यांच्याकडे पाहिल्याच्या रागातून आरोपींनी त्याला मारहाण केली. घोडके याने अश्विनच्या डोक्यावर कोयत्याने वार करून दुखापत केली. तसेच ‘मी मन्या घोडके पिंपरी-चिंचवडचा भाई आहे, काळेवाडीत राहायचे असेल तर इज्जतीत राहायचे, नाही तर मी एक एकाला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणत कोयता हवेत फिरवून दहशत माजवली. फिर्यादीचे मित्र मध्ये आले असता त्यांनाही घोडके याच्या मित्रांनी मारहाण केली.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीचे भाऊ प्रतीक व अथर्व हे सुयोग्य कॉलनीत गप्पा मारत उभे असताना निंबाळकर, सिंग, गोळे, इंगवले यांनी फिर्यादीच्या दिशेने दगड फेकले. प्रतीक व अथर्व यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण केली. महिला फिर्यादी त्यांच्या भावांना सोडविण्यासाठी मध्ये गेल्या असता निंबाळकर याने महिलेच्या बोटावर कोयत्याने वार केला. ‘मी अभी निंबाळकर काळेवाडी का डॉन हैदरभाई का राईट हॅण्ड, आपल्याशी नीट रहायचे. हैदर भाईच्या पोरांशी पंगा घेतला तर एकालाही सोडणार नाही’, असे म्हणत कोयता हवेत भिरकावला. या दहशतीने लोक भीतीने सैरावैरा पळू लागले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98496 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..