विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनीही धरला ठेका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जन मिरवणुकीत
पोलिसांनीही धरला ठेका
विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनीही धरला ठेका

विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनीही धरला ठेका

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १० ः तळेगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी पारंपारिक वाद्यांच्या तालावर ठेका धरत गणेशविसर्जन मिरवणुकीचा मनमुराद आनंद लुटला. खाकी वर्दीतील पोलिसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बँड व ढोलताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लांडगे यांच्या हस्ते गणपतीची आरती झाल्यावर व फुलांची उधळण करीत पोलिस ठाण्यापासून मिरवणुकीला सुरवात झाली. या प्रसंगी सर्व अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंब व मुले प्रथमच फेटे बांधून मिरवणुकीत सामील झाले होते. महिला दक्षता समिती, स्थापत्य व्यवस्थापन समिती, ग्रामसुरक्षा दल सभासद, वन्यजीव रक्षक संस्था व पत्रकार सहभागी झाले होते. राजवाड्यातील श्रीमंत सरदार दाभाडे घराण्यातील गणपती, शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती तसेच घरगुती गणपतींचे सातव्या दिवशीच विसर्जन झाले. त्यातून उसंत मिळताच पोलिसांनी पारंपारिक वाद्यांच्या तालावर ठेका धरत विसर्जन मिरवणुकीत एकच जल्लोष केला. मिरवणुकीत पोलिस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी, नारायण पाटील, संदेश इंगळे, शारदा शिंपणे, प्राजक्ता धापटे, उपनिरीक्षक पठारे, प्रशांत वाबळे आदी सहभागी झाले होते. मिरवणुकीचे आयोजन पोलिस स्टेशनच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, उपाध्यक्ष महेंद्र रावते. सहउपाध्यक्ष रामदास बहिरट यांनी केले.

फोटो ः ९०३६८

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98627 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..