अतिक्रमण कारवाईत अधिकाऱ्यांचा दुजाभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण कारवाईत अधिकाऱ्यांचा दुजाभाव
अतिक्रमण कारवाईत अधिकाऱ्यांचा दुजाभाव

अतिक्रमण कारवाईत अधिकाऱ्यांचा दुजाभाव

sakal_logo
By

पिंपरी : गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून अतिक्रमण विभाग स्मार्टसिटी अंतर्गत फुटपाथ व रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण हटविले जात आहे. परंतु, ही कार्यवाही एकतर्फी होत असल्याचे दिसते. छोटे व्यावसायिक टार्गेट केले जात आहेत. मोठ्या व्यावसायिकांना सोडले जात आहे. हॅरिसब्रीज ते नाशिक फाटा या पाच किलोमीटर अंतरावर अनेक मोठे हॉटेल तसेच कार खरेदी-विक्री व गाड्या डेकोरेशन करणारे व्यापारी पार्किंगसाठी अनधिकृतपणे जागा वापरत आहेत. याकडे अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त व ‘ह’ प्रभाग अधिकारी दुर्लक्ष करत आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. नगरविकास विभागाकडून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देऊनही कार्यवाही होत नसल्याचे दिसते. ई-मेल नंतर ४२ दिवस उलटूनही कार्यवाही झाली नाही. जुनी सांगवी व नवी सांगवीत देखील अतिक्रमण कारवाई एकतर्फी सुरू आहे. पार्किंगसाठी रस्त्याचे सुरक्षा कठडे तोडले गेले आहेत. तरीही, त्यांच्यावर कार्यवाही केली जात नाही.
- एक वाचक, फुगेवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98675 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..