किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करण्याची मागणी पिंपरीतून शेकडोजण होणार सहभागी : काळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरणकुमार बकाले यांना 
बडतर्फ करण्याची मागणी
पिंपरीतून शेकडोजण होणार सहभागी : काळे
किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करण्याची मागणी पिंपरीतून शेकडोजण होणार सहभागी : काळे

किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करण्याची मागणी पिंपरीतून शेकडोजण होणार सहभागी : काळे

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० : जळगाव येथील एलसीबी पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाचा अपमान केला. त्याविरोधात रोष व्यक्त केल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी बकाले यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे बकालेला तत्काळ अटक करून त्यांना बडतर्फ करण्याची सकल मराठा समाजाची मागणी आहे. याच मागणीसाठी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सकल मराठा समाज बांधव मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला पिंपरी-चिंचवड शहरातून शेकडो मराठा बांधव सामील होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या अधिकाऱ्याला त्वरित अटक करून बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी जळगाव येथील सकल मराठा समाजामध्ये सहभागी होण्याचा निर्धार पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा समाज बांधवांनी केला आहे. या मोर्चाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी सतीश काळे यांनी केले.