सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवेल रविकांत वरपे यांची शिवथाळीवरून टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवेल
रविकांत वरपे यांची शिवथाळीवरून टीका
सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवेल रविकांत वरपे यांची शिवथाळीवरून टीका

सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवेल रविकांत वरपे यांची शिवथाळीवरून टीका

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन थाळी ही महत्वकांक्षी योजना सुरू केली. केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु केलेली शिवभोजन थाळी ही आताचे शिंदे-फडणवीस सरकार बंद करणार आहे. महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त सामान्य माणसाला राज्य सरकारने आणखी त्रासात ढकलून गोरगरीब मराठी माणसांच्या पोटावर लाथ मारू नये, अन्यथा सामान्य जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी सरकारवर केली आहे.
शिवभोजन थाळीने कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या, रोजीरोटीची कामे बंद पडलेल्या कित्येक गरीब व गरजू जनतेला माफक दरात अन्न देण्याचं पुण्य केलं व संकट काळात आधार दिला. कोरोना काळात हाताला काम नसलेला एक मोठा कामगार वर्ग आहे, अशा गरजू कुटुंबासाठी ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजूर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्‍न शिवभोजन थाळीच्या माध्यमातून सोडवला, असे वर्पे यांनी सांगितले.

दहा रुपयांत पोटभर जेवण देण्याचा हा निर्णय, कोरोना संकटात व त्यानंतरही बेरोजगारीत असलेल्या लाखो निराश्रित नागरिकांच्या पोटाचा आधार ठरला होता. पण; खोके खाऊन ओक्के झालेल्या या गद्दार सरकारला महाविकास आघाडी सरकारची कावीळ झालीय म्हणूनच महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक लोकाभिमुख निर्णयांना सरकारने एकतर स्थगिती दिली किंवा ते रद्द केले आहेत.
- रविकांत वरपे, प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस