निगडी प्राधिकरणात साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडी प्राधिकरणात साकारली
श्रीराम मंदिराची प्रतिकृती
निगडी प्राधिकरणात साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

निगडी प्राधिकरणात साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ ः निगडी प्राधिकरणातील श्री समर्थ युवक प्रतिष्ठानतर्फे नवरात्रीनिमित्त अयोद्धेतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. अत्यंत कलात्मक पद्धतीने उभारलेला देखावा प्राधिकरणातील जलतरण तलावाशेजारी आहे. मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अमित गावडे यांच्या संकल्पनेतून देखावा साकारला असून, तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. नवरात्रीच्या दहा दिवसांत देवीची आराधना, नित्य आरती, पूजा, भजन असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यंदा प्रतिष्ठानचे पंधरावे वर्षे आहे. दसऱ्याच्या दिवशी बुधवारी (ता. ५) सायंकाळी रावणदहन होणार आहे.
--
फोटोः 95094