‘एम्पायर स्क्वेअर’चा वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एम्पायर स्क्वेअर’चा वर्धापनदिन उत्साहात
‘एम्पायर स्क्वेअर’चा वर्धापनदिन उत्साहात

‘एम्पायर स्क्वेअर’चा वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ ः चिंचवड स्टेशन येथील एम्पायर स्क्वेअर ज्येष्ठ नागरिक संघाचा प्रथम वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. पीसीएमसी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अरुण बागडे, कार्यध्यक्ष वृषाली मरळ यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. सभासदांचे वाढदिवस साजरे केले. दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. विनोद नायर व अनिता शर्मा यांचे बहारदार गायन झाले. संघाचे अध्यक्ष सदानंद बोगम यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप तळेकर यांनी आभार मानले.
---