महाविद्यालयीन काळातच व्यक्तिमत्व बहरते : तरडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयीन काळातच व्यक्तिमत्व बहरते : तरडे
महाविद्यालयीन काळातच व्यक्तिमत्व बहरते : तरडे

महाविद्यालयीन काळातच व्यक्तिमत्व बहरते : तरडे

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० : ‘‘महाविद्यालयीन काळ हा व्यक्तिमत्त्व सर्वांगाने परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. हा काळ एकदा संपला की, पुन्हा अनुभवण्यास मिळत नाही. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा या प्रकारात ही नैपुण्य प्राप्त करणे महत्त्वाचे आहे’’, असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय यांच्या वतीने झालेल्या ‘स्वररंग : युवक महोत्सवा’चे उद्घाटन तरडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संचालक सर्वश्री ज्ञानेश्वर मुरकुटे, मोहन जैन, राजेंद्र भुतडा, सुधीर फेंगसे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. गौरी माटेकर, सांस्कृतिक विभागप्रमुख व युवक महोत्सवाचे समन्वयक प्रा. महादेव रोकडे उपस्थित होते.

विद्यापीठ स्तरीय महोत्सवात विद्यापीठांतर्गत ४२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. यावर्षी टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या एकांकिकेसाठी अभिनय नैपुण्य आणि विशेष अभिनय पारितोषिक प्राप्त केलेल्या ऋतिक रास्ते, हर्षवर्धन मोहिते यांना प्रवीण तरडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यावेळी प्रा. गौरी माटेकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी स्वागत केले. संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी स्वररंग युवक महोत्सवाची माहिती, नियम आणि सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. महादेव रोकडे यांनी सूत्रसंचालन केले.