विद्यार्थ्यांनो, अपयशाने खचून न जाता मार्गक्रमण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनो, अपयशाने खचून न जाता मार्गक्रमण करा
विद्यार्थ्यांनो, अपयशाने खचून न जाता मार्गक्रमण करा

विद्यार्थ्यांनो, अपयशाने खचून न जाता मार्गक्रमण करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० ः ‘‘विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपल्यातील सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रचंड इच्छाशक्ती व आत्मविश्‍वास बाळगल्यास यश नक्की मिळते. त्यामुळे अपयशाने खचून न जाता मार्गक्रमण केले पाहिजे’’, असे प्रतिपादन गणित अभ्यासक लक्ष्मण गोगावले यांनी केले.

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या उपक्रमातंर्गत आयोजित ‘गणितातील गमतीजमती’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. साने गुरूजी आदर्श विद्यानिकेतन, थेरगाव येथे या कार्यशाळेचे आयोजन केले होते. ,

गोगावले म्हणाले, ‘‘गणित हा सोपा विषय आहे. पैकीच्या पैकी गुण देणारा हा एकमेव विषय असून त्याची भीती न बाळगता त्याला छंद म्हणून जोपासले पाहिजे. गणितातील क्लृप्त्या व्यवस्थित लक्षात ठेवल्यास गणित अधिक प्रभावी होवू शकते. त्यामुळे गणिताची उजळणी वारंवार केली पाहिजे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तीन अंकी चार अंकी संख्येचे गुणाकार, भागाकार, सोप्या पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न केला. जन्मतारखेवरून जन्मवार क्षणार्धात सांगताना विद्यार्थ्यांसह शिक्षकसुद्धा अवाक झाले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयातील सोप्या क्लृप्त्या सांगितल्या.’’

यावेळी मुख्याध्यापिका श्रुतिका जाधव, संतोष स्वामी ,चंद्रकांत सोनवणे, ज्ञानेश्‍वर सुपे, अरूणा भालेराव, उज्वला गव्हाणे उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम प्राथमिक शाळेत आर्ट क्राफ्ट प्रशिक्षक मानसी महाजन यांनी विद्यार्थ्यांना कागदापासून शोभेच्या वस्तू बनविण्यास शिकविले. रद्दी वर्तमानपत्र, रंगीत पेपर, फेव्हिकॉल यांचा वापर करीत घरातील विविध वस्तूंचा वापर करीत शोभिवंत वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कागदापासून फुले व बॉक्स बनविण्यास शिकविले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुंगसे, अमृता भोईटे,कांचन केंडे, मृणाल धसे, शीतल महांकाळे, सुजाता भोंगे, मोनिक बोरसे, अर्चना येळे, वैशाली खरबुडे उपस्थित होते.

‘सकाळ एनआयईचे सहव्यवस्थापक विशाल सराफ यांनी कार्यशाळांचे संयोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांना सकाळ एनआयई अंकाचे वितरण सुद्धा करण्यात आले.

फोटो ः ९५६६०