तरुणाचे अपहरण करून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाचे अपहरण करून मारहाण
तरुणाचे अपहरण करून मारहाण

तरुणाचे अपहरण करून मारहाण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० : शिडी घेतल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण केली. त्याला जबरदस्तीने टेम्पोत बसवून पुन्हा मारहाण केल्याचा प्रकार हिंजवडी येथे घडला.

याप्रकरणी जैशमोहम्मद अब्दुलरहीम सिद्दीकी (रा. स्पाईन रोड, हिंजवडी, मूळ-उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता काळकुटे, नागेश काळकुटे, कृष्णा काळकुटे, शाकीर शेख (रा. वारजे ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे बुधवारी सायंकाळी अटलांटा सोसायटीसमोरील बसलेले असताना शेजारील हॉटेलमध्ये फॅब्रिकेशनचे काम करणारी चार मुले तेथे आली. फिर्यादी यांनी आरोपींची शिडी घेतल्याचा संशय त्यांना होता. त्यावरून आरोपींनी सुरुवातीला फिर्यादीकडे शिडीची मागणी केली. मात्र, शिडीबाबत माहिती नसल्याने फिर्यादी यांनी सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना पुन्हा मारहाण केली. जबरदस्तीने टेम्पोत बसवून वारजे येथील आरोपींच्या फॅब्रिकेशनच्या शॉपवर नेले. दरम्यान, फिर्यादीस पुन्हा रॉडने डोक्यावर, हातावर, पाठीवर मारहाण करून जखमी केले.
------------------------