अपघाताचा बनाव करून लूटमार करणारे दोघे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघाताचा बनाव करून 
लूटमार करणारे दोघे अटकेत
अपघाताचा बनाव करून लूटमार करणारे दोघे अटकेत

अपघाताचा बनाव करून लूटमार करणारे दोघे अटकेत

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : अपघाताचा बनाव करून लूटमार करणाऱ्या साहिल संजय मराठे (वय २१, रा. भुकूम), हर्षल सुनील गोळे (वय २०, रा. पिरंगुट ) या दोघांना हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले.
पराग प्रकाश रस्तोगी (रा. ताथवडे) हे ११ ऑगस्टला मुंबई-बंगलोर मार्गाने दुचाकीवरून जात होते. दरम्यान, बाणेर येथे दुसऱ्या दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. ‘तुझ्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली, माझा मोबाईल पडल्याने बंद झाला’ असे म्हणत दुचाकीला डॅश लागल्याचा बहाणा केला. रस्तोगी यांची कॉलर पकडून शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेचा तपास करीत असताना दोघेजण अपघाताचा बनाव करून लोकांना धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मौजमजेसाठी हा गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच दोन महिन्यांपूर्वी सुसखिंड येथे अशाचप्रकारे अपघाताचा बनाव करून टेंपोचालकाला मारहाण करीत रोकड व दागिने लुटल्याचेही त्यांनी कबूल केले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.