‘अमरजाई’च्या दर्शनासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अमरजाई’च्या दर्शनासाठी
दोन किलोमीटरपर्यंत रांगा
‘अमरजाई’च्या दर्शनासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा

‘अमरजाई’च्या दर्शनासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १ ः अमरजाई मातेच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची आज दिवसभर प्रचंड गर्दी झाली होती. दर्शनासाठी पायथ्यापासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. येथे पार्किंगची सोय नसल्याने भाविकांनी मुंबई-पुणे महामार्गालगत वाहने उभी केल्याने वाहनाच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. मंदिर समितीच्यावतीने सर्व भाविकांना दर्शनासाठी सोय उपलब्ध केली होती. तळेगाव व देहूरोड महिला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. शेलारवाडी ग्रामस्थांच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दररोज महापूजा, आरती, होम हवन, अभिषेक, प्रवचन, भजन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. उत्सवानिमित्त मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती तर मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पांडवांच्या अज्ञात वासाच्या काळात अमरजाई माता एका दगडी शिळेतून प्रगट झाली, अशी आख्यायिका आहे. हे देवस्थान स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. आज सहावी माळ असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी वाढली होती.
फोटो ः शेलारवाडी ः देवीच्या दर्शनासाठी महिला भाविकांनी केलेली गर्दी.
Smt1Sf1.
------------------------------------------------------------------------------